1 / 9'मिस वर्ल्ड' (Miss World ) या स्पर्धेची सुरुवात १९५१ मध्ये लंडनमध्ये झाल होती. तेव्हापासून आजपर्यंत ६ भारतीय 'मिस वर्ल्ड' झाल्या आहेत. 'मिस वर्ल्ड' ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी एक आहे. 2 / 9नुकतंच 'मिस वर्ल्ड २०२५' (Miss World 2025) चा महाअंतिम सोहळा भारतातील हैदराबाद येथे ३१ मे रोजी पार पडला. थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिने 'मिस वर्ल्ड २०२५'चा मुकुट जिंकलाय.3 / 9रीटा फारिया (Reita Faria) 'मिस वर्ल्ड' चा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या. रीटा फारियाने १९६६ मध्ये 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला होता. तिने 'बेस्ट इन स्विम सूट' आणि 'बेस्ट इन इव्हनिंग वेअर' हे किताबही जिंकले. भारताच्या पहिल्या 'मिस वर्ल्ड'नं मुंबईतील पाचगणी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तिने मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आणि लंडनमधील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. २३ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनी म्हणून 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकणारी पहिली आशियाई होती.4 / 9अभिनेत्री ऐश्वर्या रॉय (Aishwarya Rai) 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकणारी दुसरी भारतीय आहे. १९ नोव्हेंबर १९९४ रोजी वयाच्या २१ वर्षी तिने 'मिस वर्ल्ड'चा ताज आपल्या नावी केला होता. ती त्यावेळी आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होती.5 / 9दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी एन्टरटेन्मेंट सेंटरमध्ये ८७ देशांच्या मॉडेल्सना पिछाडत ऐश्वर्याने 'मिस वर्ल्ड' होण्याचा मान पटकावला होता. ऐश्वर्याच्या मोहक सौंदर्याने परीक्षकांवरही भूरळ घातली होती. इतकच नव्हे तर हा क्राऊन जिंकल्यावर ऐश्वर्याने दिलेल्या भाषणामुळेही साऱ्यांची मनं जिंकली होती. 6 / 9१९९७ मध्ये 'मिस वर्ल्ड' स्पर्धा जिंकणारी डायना (Diana Hayden) ही रीटा फारिया व ऐश्वर्या राय नंतर तिसरी भारतीय महिला आहे. हैदराबादची रहिवासी डायनाने सिकंदराबादमधील सेंट अँन्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. ती एक अभिनेत्री, मॉडेल, लेखिका, टीव्ही होस्ट आणि सामाजिक कार्यकर्ता देखील आहे.7 / 9युक्ता मुखी (yukta mukhi) हिनं डायनानंतर १९९९ साली 'मिस वर्ल्ड' किताब जिंकला होता. तिने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.8 / 9जमशेदपूरमध्ये जन्मलेल्या प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) २००० मध्ये 'मिस वर्ल्ड' होण्याचा मान पटकावला होता. प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड जिंकणारी पाचवी भारतीय स्पर्धक होती. प्रियंका आज ग्लोबल स्टार आहे. तिने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे.9 / 9मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) हिनं २०१७ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ती सहावी भारतीय आहे. ती एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका आणि कुचीपुडी नृत्यांगना देखील आहे. आज ती एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे.