Join us

फक्त डाळ-भात आणि...; ५९ व्या वर्षी फिट राहण्यासाठी काय खातात मिलिंद सोमण? जाणून घ्या

By देवेंद्र जाधव | Updated: September 26, 2025 09:46 IST

1 / 7
मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण सध्या ५९ व्या वर्षांचा आहे. त्याचा फिटनेस लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात मिलिंद सोमण ६० वर्षांचा होईल. काय आहे मिलिंद सोमणचं फिटनेसचं रहस्य?
2 / 7
मिलिंद नाश्त्याला नेहमी फळं खाण्यास प्राधान्य देतो. नेहमी ताजी आणि हंगामी फळं (Seasonal Fruits) खाऊन तो दिवसाची सुरुवात करतो. याशिवाय चहा किंवा बिस्किट असे पदार्थ तेो खात नाही.
3 / 7
फळं खाताना पण मिलिंद सोमण फक्त एक दोन स्लाईस न खाता भरपूर प्रमाणात त्याचा आस्वाद घेतात. यामुळे त्याला दिवसभराची ऊर्जा मिळते.
4 / 7
मिलिंद सोमणला डाळ, भात आणि भाज्या यांसारखे साधं पण पौष्टिक अन्न अधिक आवडतं. त्यामुळे जीभेचे चोचले न पुरवता फिटनेससाठी तो साधं तरीही रुचकर जेवण जेवतो
5 / 7
याशिवाय मिलिंद सोमणचं रात्रीचं जेवणही हलकं आणि साधं असतं. पचायला जड असलेले मांसाहार पदार्थ रात्री खाणं ते पूर्णपणे टाळतात.
6 / 7
मिलिंदला महाराष्ट्रीयन, बंगाली, आसामी आणि जपानी पदार्थांसारखे विविध पदार्थ खायला आवडतात, पण ते पदार्थ पारंपारिक पद्धतीने बनवलेले असावेत, असा त्याचा आग्रह असतो.
7 / 7
मिलिंद गवळीला त्याच्या फिटनेससाठीची प्रेरणा त्याच्या आईकडून मिळालेली दिसतेय. कारण मिलिंदची आई वयाच्या ८६ व्या वर्षीही दोरीवरच्या उड्या मारुन त्यांच्या फिटनेससने सर्वांना थक्क करुन सोडतात
टॅग्स :मिलिंद सोमण फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यआहार योजना