1 / 7माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. माधुरीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. माधुरीचे असंख्य चाहते आहेत पण असा एक कलाकार होता जो माधुरीचा सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बूक करायचा2 / 7हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून ते होते जागतिक दर्जाचे चित्रकार एम. एफ. हुसेन. चित्रकार हुसेन हे माधुरीचे डाय हार्ड फॅन होते. 3 / 7महाराष्ट्रात जन्माला आलेले एम. एफ. हुसेन यांचं पूर्ण नाव मकबूल फिदा हुसेन आहे. त्यांनी चित्रकार म्हणून काम केलंच शिवाय काही सिनेमांसाठी पटकथालेखक म्हणूनही जबाबदारी निभावली4 / 7एम. एफ. हुसेन माधुरी दीक्षितवर अक्षरशः जीव ओवाळून टाकायचे. ते माधुरीचा सिनेमा बघण्यासाठी संपूर्ण थिएटर बूक करायचे. त्यांनी हम आपके है कौन हा माधुरीचा सिनेमा ७३ वेळा पाहिला होता5 / 7यानंतर ते माधुरीचे इतके फॅन झाले की, अभिनेत्रीला घेऊन एखादा सिनेमा करायचाच, असा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळेच २००० साली त्यांनी गजगामिनी सिनेमा बनवला. या सिनेमात माधुरी प्रमुख भूमिकेत होती. 6 / 7गजगामिनी सिनेमात माधुरीसोबत नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी हे कलाकारही होते. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला7 / 7९ जून २०११ रोजी एम. एफ. हुसेन यांनी अखेरचा श्वास घेतला. आजही माधुरी दीक्षित त्यांची आठवण जागवताना दिसते.