Join us

बॉलिवूडची 'दामिनी'! कुठे गेली 'ही' अभिनेत्री? वयाच्या ६१ व्या वर्षीही दिसते ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:00 IST

1 / 7
१९९३ साली आलेल्या 'दामिनी' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रि (Meenakshi Sheshadri). या सिनेमात ती सनी देओलसोबत दिसली. त्या काळी हा सिनेमा तुफान गाजला होता.
2 / 7
मिनाक्षी शेषाद्रिने 'घातक','घायल','हीरो','मेरी जंग','घर हो तो ऐसा' सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ८०-९० च्या दशकात आलेल्या या सिनेमांमुळे तिला वेगळी ओळख मिळाली. 'लंबी जुदाई' या गाजलेल्या गाण्यातही मिनाक्षी होती.
3 / 7
मिनाक्षीने वयाच्या १७ व्या वर्षी 'मिस इंडिया'चा खिताब पटकावला होता. यानंतर तीन वर्षांनी तिने 'पेंटर बाबू' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
4 / 7
अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, अनिल कपूर, सनी देओल, विनोद खन्ना यांसारख्या मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. यासोबत ती इंडस्ट्रीत आघाडीची अभिनेत्री बनली होती.
5 / 7
करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिने इंडस्ट्री सोडली. अमेरिकेतील इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूर यांनी तिच्यासाठी फोनवरच लग्नाचा प्रस्ताव ठेवला. नंतर दोघांनी लग्न केलं. तेव्हापासून ती अमेरिकेतच आहे.
6 / 7
आज मिनाक्षी बॉलिवूडपासून बरीच दूर आहे. ती सध्या ६१ वर्षांची आहे आणि आजही तितकीच ग्लॅमरस आहे. तिच्या सध्याच्या फोटोंमधून तिला ओळखणंही कठीण आहे.
7 / 7
या ग्लॅमरस फोटोंमधून त्यांच्या वयाचा अंदाजही लागत नाही. आजही ती उत्तम डान्सही करते. अमेरिकेतच ती डान्स इन्स्टिट्यूट चालवते.
टॅग्स :मिनाक्षी शेषाद्रीबॉलिवूड