वयाच्या १७व्या वर्षी लग्न, नंतर घटस्फोट; ४०व्या वर्षी लग्नाशिवाय झाली आई, ४७व्या वर्षी अभिनेत्रीने पुन्हा थाटला संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:51 IST
1 / 9माही गिल तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळेच जास्त चर्चेत असते. अभिनेत्री उद्या म्हणजेच १९ डिसेंबर रोजी तिचा ४९ वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.2 / 9माही गिलने तिच्या करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपटांत काम केले आहे. मात्र, तिला खरी ओळख 'देव डी' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. चित्रपटांसोबतच माही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.3 / 9अभिनेत्रीने अवघ्या १७व्या वर्षी पहिले लग्न केले होते. आता ती पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली असून तिला एक गोंडस मुलगी देखील आहे. 4 / 9२०१२ मध्ये 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत माहीने आपल्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला होता. जेव्हा पहिल्या पतीसोबत गोष्टी नीट जमल्या नाहीत, तेव्हा तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.5 / 9पहिल्या अयशस्वी लग्नाबद्दल बोलताना माही म्हणाली होती की, 'त्यावेळी मी खूप लहान आणि अपरिपक्व होते, कदाचित म्हणूनच ते लग्न टिकले नाही.'6 / 9'फॅमिली ऑफ ठाकूरगंज'च्या प्रमोशनदरम्यान माहीने एक खळबळजनक खुलासा केला होता की, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहते आणि तिला एक मुलगी देखील आहे. माहीने अभिमानाने सांगितले होते की, 'एक मुलीची आई असल्याचा मला अभिमान आहे.'7 / 9तेव्हा ती म्हणाली होती, 'हो, मी अजून लग्न केलेले नाही. जेव्हा मला लग्न करावेसे वाटेल, तेव्हा मी नक्की करेन. माझी मुलगी वेरोनिका ऑगस्टमध्ये तीन वर्षांची होईल. माझा बॉयफ्रेंड कॅथोलिक नसून तो एक व्यावसायिक आहे.' 8 / 9२०१९ मध्ये माहीचे नाव रवी केसरसोबत जोडले गेले होते आणि ते एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.9 / 9अखेर काही वर्षांनंतर, २०२३ मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत माही गिलने स्पष्ट केले की, तिने रवी केसरसोबत लग्न केले आहे. सध्या ही अभिनेत्री तिच्या पती आणि मुलीसोबत गोव्यात स्थायिक आहे.