By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 17:19 IST
1 / 10बॉलिवूडची दमदार अभिनेत्री राणी मुखर्जी अलीकडच्या काळात मोजकेच चित्रपट करतेय. पण, तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतात. 2 / 10राणीच्या मर्दानी' या चित्रपटाचा तिसरा भाग अर्थातच 'मर्दानी ३' शुक्रवारी ३० जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यापूर्वी 'मर्दानी' आणि 'मर्दानी २'ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले होते. 3 / 10पडद्यावर निर्भीड पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी राणी खऱ्या आयुष्यात मात्र उच्चशिक्षित आहे. 4 / 10राणी मुखर्जीचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी मुंबईत झाला. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जुहू येथील माणेकजी कूपर हायस्कूलमध्ये झाले. 5 / 10शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने उच्च शिक्षणाकडे लक्ष दिले. राणीने मुंबईतील प्रसिद्ध एसएनडीटी महिला विद्यापीठातून 'गृहविज्ञान' विषयात आपली पदवी पूर्ण केली आहे. 6 / 10केवळ शिक्षणच नाही, तर राणीला कलेचीही तितकीच आवड होती. दहावीत असताना तिने ओडिसी या शास्त्रीय नृत्यप्रकाराचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते.7 / 10राणीच्या कुटुंबाचा चित्रपट क्षेत्राशी जुना संबंध होता. तिचे वडील राम मुखर्जी हे चित्रपट दिग्दर्शक होते. राणीने १९९६ मध्ये 'बियेर फूल' या बंगाली चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. 8 / 10राणीनं त्यानंतर १९९७ मध्ये तिने 'राजा की आयेगी बरात' मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. मात्र, खऱ्या अर्थाने तिला ओळख मिळाली ती १९९८ मध्ये आलेल्या 'गुलाम' आणि 'कुछ कुछ होता है' या चित्रपटांमुळे. 9 / 10सावळ्या रंगामुळे आणि वेगळ्या आवाजामुळे सुरुवातीला टीका सहन करावी लागली असली तरी, आज राणी बॉलीवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. राणीने आतापर्यंत तब्बल ७ फिल्मफेअर पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.10 / 10२०१४ मध्ये राणीने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि 'यशराज फिल्म्स'चे मालक आदित्य चोप्रा यांच्याशी इटलीमध्ये गुपचूप लग्न केले. त्यांना 'आदिरा' नावाची एक मुलगी आहे.