Join us

ना करीना, ना ऐश्वर्या! 'ही' मराठी अभिनेत्री LUX साबणाच्या जाहिरातीत पहिल्यांदा झळकली होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:18 IST

1 / 7
लक्स साबणाची जाहिरात दिसली की आज या जाहिरातीत अनेक बॉलिवूड अभिनेत्री झळकताना दिसतात. पण या बॉलिवूड अभिनेत्रींच्या आधी एक मराठी अभिनेत्री या जाहिरातीत झळकली होती. कोण होती ती अभिनेत्री?
2 / 7
या अभिनेत्रीचं नाव होतं लीला चिटणीस. लीला चिटणीस यांचा जन्म १९०९ मध्ये झाला होता. त्यांचे वडील इंग्रजी साहित्य विषयाचे प्राध्यापक होते.
3 / 7
लीला यांनी बीए (B.A.) पर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांचं खूप कमी वयात एका श्रीमंत आणि उच्चशिक्षित व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. त्यांना चार मुलं होती.
4 / 7
मात्र, काही वर्षांनंतर लीला यांनी पतीपासून घटस्फोट घेतला. त्या काळात घटस्फोट घेणं हे एक अत्यंत मोठं आणि धाडसी पाऊल मानलं जात होतं.
5 / 7
घटस्फोटानंतर कुटुंबाचा आणि मुलांचा खर्च सांभाळण्यासाठी लीला यांनी चित्रपटसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. १९३० च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यावेळी त्या ३० वर्षांच्या होत्या.
6 / 7
लीला चिटणीस यांनी केवळ चित्रपटांमध्येच नाही, तर जाहिरात विश्वातही इतिहास रचला. त्या काळात 'लक्स' (Lux) साबणाची जाहिरात करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या.
7 / 7
लीला यांनी दिलीप कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, सुनील दत्त आणि अशोक कुमार यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या आईची भूमिका साकारली. २००३ साली वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं
टॅग्स :जाहिरातबॉलिवूडदिलीप कुमारमराठी चित्रपटमराठी अभिनेता