By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:59 IST
1 / 10 भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. 2 / 10नताशापासून विभक्त झाल्यावर हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांची जोडी जमली आहे. दोघे एकमेंकासोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यात आता खास फोटोंची भर पडली आहे.3 / 10 व्हॅलेंटाईन विकमध्ये हार्दिक आणि माहिका शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 4 / 10माहिका शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर हार्दिकचा एक खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये हार्दिक बेडवर बसलेला असून त्याच्या समोर गुलाबांचा एक मोठा पुष्पगुच्छ दिसत आहे. हा फोटो शेअर करताना माहिकाने लिहिले, 'वेळेत दिल्लीत पोहोचले. माझ्या आयुष्याचा 'मॅन ऑफ द मॅच'' 5 / 10माहिकाची ही स्टोरी रिपोस्ट करत हार्दिकने लिहिले, 'व्हॅलेंटाईन आणि माझ्या बेबीचा बर्थडे वीक सुरू झाला आहे'. 6 / 10माहिका २४ वर्षांची आहे. दिल्लीची रहिवासी असलेली महिका हिचा जन्म २००१ मध्ये झाला. तर हार्दिक हा ३२ वर्षांचा आहे. या दोघांच्या वयामध्ये ८ वर्षांचे अंतर आहे.7 / 10माहिकाने अर्थशास्त्र आणि वित्तशास्त्र या विषयात पदवी संपादन केली आहे. ती एक यशस्वी मॉडेल आहे. 8 / 10मॉडेलिंगशिवाय माहिका अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावत आहे. 'इन टू डस्क', 'पीएम नरेंद्र मोदी' यांसारख्या सिनेमांमध्ये ती छोट्या भूमिकेत दिसली होती.9 / 10माहिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती चाहत्यांना फिटनेस आणि फॅशन टिप्स देत असते.10 / 10हार्दिकला पाठिंबा देण्यासाठी ती सामन्यातही हजेरी लावते. दरम्यान, हार्दिकने याआधी नशातासोबत लग्न केलं होते. २०२० मध्ये त्यांनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांना अगस्त्य हा मुलगादेखील आहे. मात्र २०२४ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.