1 / 11 बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात.कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. 2 / 11मिळालेल्या माहितीनुसार ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामिल झाले आहे ते महक चहल आणि अश्मित पटेल यांचं. 3 / 11दोघांचे नातं संपुष्टात आले आहे. मात्र अद्याप यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी साखरपुडा केला. 4 / 11आता ते लग्न कधी करणार याची उत्सुकता सगळ्यांना असतानाच दोघांनी साखरपुडा मोडल्याचे जाहीर केले .यानंतर दोघांनीही यावर बोलणे टाळले होते. 5 / 11शेवटी दिलेल्या एका मुलाखतीत महक चहलने याबाबत खुलासा केला आहे. खरंतर इतका मोठा निर्णय घेणे खरंच खूप कठीण होतं. 6 / 11पण जेव्हा आपण एकमेकांसोबत राहायला लागतो तेव्हाच आपल्याला समोरच्या माणसाचे खरे गुण कळतात. त्याच दरम्यान जाणवले की,अश्मित माझ्यासाठी योग्य पार्टनर नाही. 7 / 11लग्नानंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा मी आधीच काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्यामुळे शेवटी लग्न न करणे हाच चांगला पर्याय होता. 8 / 11आमच्या ब्रेकअपनतर मी वर्षभर गोव्यातच राहिले. यातून सावरल्यानंतर आता मी पुन्हा मुंबईत आले आहे.9 / 11महक चहल आता सगळे काही विसरुन 'खरतरों के खिलाडी ११' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.10 / 11महक चहल हिने दबंग सलमान खानच्या वॉन्टेड सिनेमातही काम केले आहे. 11 / 11याशिवाय बिग बॉस सीझन पाचमध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. याशिवाय छोट्या पडद्यावरील कवच या मालिकेतही तिने काम केले आहे.