Join us

पंकज धीर यांच्या निधनानंतर कुटुंबात कोण-कोण? लेक आणि सून आहेत टॉपचे स्टार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:48 IST

1 / 10
दिग्गज अभिनेता पंकज धीर यांचं वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झालं. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते.
2 / 10
बी.आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका साकारली होती, ज्यामुळे ते घराघरात लोकप्रिय झाले होते.
3 / 10
पंकज यांनी अनेक दशकं इंडस्ट्रीमध्ये काम केलं असून अनेक दर्जेदार चित्रपट दिले.
4 / 10
पंकज धीर यांच्या अचानक निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पंकज धीर यांच्या कुटुंबात कोण कोण आहे, याविषयी जाणून घेऊया...
5 / 10
पंकज धीर यांनी १९ ऑक्टोबर १९७९ मध्ये अनिता यांच्याशी लग्न केले. अनिता सोशल मीडियापासून दूर राहतात.
6 / 10
या लग्नापासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव नितिका शाह असं आहे. तर मुलानं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय.
7 / 10
पंकज धीर यांच्या मुलाचं नाव निकितिन धीर आहे. तो एक लोकप्रिय अभिनेता आहे. निकितिननं बॉलिवूडबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केलं आहे.
8 / 10
निकितिन धीरनं 'जोधा अकबर' (२००८) मधून चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतली. यानंतर तो 'चेन्नई एक्स्प्रेस' (२०१३) मधील 'थंगबली' भूमिकेमुळे लोकप्रिय झाला. यानंतर तो 'दबंग २' (२०१२) आणि 'सूर्यवंशी' (२०२१) यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांत झळकला.
9 / 10
पंकज यांची सून कृतिका सेंगरदेखील टिव्हीची स्टार अभिनेत्री आहे. 'झाँसी की रानी' या मालिकेमुळे कृतिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. ३ डिसेंबर २०१४ रोजी निकितिन आणि कृतिका यांनी लग्नगाठ बांधली.
10 / 10
पंकज धीर यांना एक नातदेखील आहे. निकितन आणि कृतिका यांच्या मुलीचं नाव देविका धीर असं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंकज धीर मृत्यूनंतर कुटुंबियांसाठी तब्बल 42 कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेऊन गेले आहेत.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड