Join us
Daily Top 2Weekly Top 5

तजेलदार सौंदर्यासाठी माधुरीनं दिल्या खास टिप्स, ५८ वर्षे वय पण दिसते कमाल सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:44 IST

1 / 10
'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित हे बॉलिवूडमधलं एक लोकप्रिय नाव आहे. जेव्हा तिच्या सौंदर्याचा विषय येतो, तेव्हा मात्र सगळेच तिचं कौतुक करतात.
2 / 10
आज ५८ वर्षांची होऊनही माधुरी दीक्षितचं सौंदर्य अबाधित आहे. तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि तिचं ग्रेसफुल व्यक्तिमत्व तितकंच ताजंतरुण दिसतं.
3 / 10
तिची त्वचा इतकी तजेलदार आणि नितळ कशी आहे, हा प्रश्न तिच्या लाखो चाहत्यांना पडतो.
4 / 10
नुकतीच 'मिसेस देशपांडे' या सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या माधुरीने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये तिच्या सौंदर्याचं गुपित उघड केलं आहे.
5 / 10
माधुरीनं त्वचेसाठी मॉइश्चरायझर एसपीएफ सनस्क्रीन आणि रेटिनॉइड खूप महत्वाचे असल्याचं सांगितलं. पण, यासोबतचं माधुरीनं हेही सांगितलं की 'बाहेरून सुंदर दिसण्यासाठी आतून हेल्दी असणे महत्त्वाचे आहे', असेही तिनं सांगितलं.
6 / 10
माधुरी दीक्षितने सांगितलं की, तुम्ही कितीही स्किन केअर प्रोडक्ट वापरले, तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे सकारात्मकता.
7 / 10
माधुरी म्हणाली, 'सौंदर्य हे फक्त स्किन केअर प्रोडक्टमधून मिळत नसतं. आपलं मन देखील तेवढंच सुंदर असलं पाहिजे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे'.
8 / 10
पुढे ती म्हणाली, 'कोणाबद्दलही नकारात्मक विचार करू नये. मला लोकांशी बोलायला आवडतं, त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. मी काय आहे, कोण आहे? या गोष्टीचा मला फारसा फरक पडत नाही'
9 / 10
माधुरीने खुलासा केला की ती सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ओंकार आणि गायत्री मंत्राचा जप करते. तसेच नियमितपणे मेडिटेशन करते.
10 / 10
माधुरी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप आठवणीने काढते. यामुळेच तिची त्वचा इतकी स्वच्छ आणि उजळ दिसते.
टॅग्स :माधुरी दिक्षित