बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत माधुरी दीक्षितला करायचा नव्हता लीड रोल, नाकारला हा सुपरहिट सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 12:46 IST
1 / 7बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर हिट होतात. अनेकवेळा चित्रपटांमधील कलाकारांच्या जोडीलाही खूप पसंती दिली जाते. पण असे काही स्टार्स आहेत जे मोठ्या पडद्यावर एकत्र काम करण्यास टाळाटाळ करतात. आज आम्ही त्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत ज्यात मुख्य अभिनेत्याचे नाव ऐकून या अभिनेत्रीने ऑफर नाकारली होती.2 / 7आम्ही बोलत आहोत त्या बॉलिवूड चित्रपटाबद्दल ज्यामध्ये गोविंदा मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने गोविंदाचे नशीब बदलले. पण खूप मेहनतीनंतर हा चित्रपट गविंदाच्या हातात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.3 / 7१९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव 'इल्जाम' होते. या चित्रपटात गोविंदाची मुख्य भूमिका होती. या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती गोविंदा नाही तर मिथुन चक्रवर्ती होते. मिथुन चक्रवर्ती यांनी व्यग्र वेळापत्रकामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. यानंतर निर्मात्यांनी गोविंदाला कास्ट केले.4 / 7अभिनेत्यानंतर चित्रपटाचे निर्माते पहलाज निहलानी यांना या चित्रपटात मोठ्या अभिनेत्रीला मुख्य भूमिका द्यायची होती. या चित्रपटासाठी निर्मात्याची पहिली पसंती होती ती बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित. माधुरी देखील या चित्रपटाचा एक भाग असणार होती परंतु गोविंदा मुख्य अभिनेता आहे हे ऐकल्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटाची ऑफर नाकारली.5 / 7१ कोटी ४० लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने रिलीज होताच खळबळ उडवून दिली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४ कोटी १६ लाखांची कमाई केली होती.6 / 7या चित्रपटात गोविंदासोबत नीलम कोठारी, अनिता राज, शत्रुघ्न सिन्हा, प्रेम चोप्रा यांनीही काम केले होते. या चित्रपटात गोविंदा आणि नीलम कोठारी यांची जोडी खूप आवडली होती.7 / 7गोविंदा सुपरस्टार झाल्यानंतर माधुरी दीक्षितने त्याच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले.