Join us
Daily Top 2Weekly Top 5

Happy Birthday Madhuri : डॉ नेनेंसोबत 'ती' बाईक राईड अन्...अशी सुरु झाली माधुरीची लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2023 09:38 IST

1 / 9
'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आज ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाची पन्नाशी उलटूनही माधुरीच्या चेहऱ्यावरील तेज कायम आहे. आजही तिच्या डान्स आणि एक्सप्रेशनचे लोक दिवाने आहेत.
2 / 9
माधुरीने केवळ ३ वर्षांची असताना कथ्थकचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तर ८ व्या वर्षीच तिने स्टेजवर परफॉर्म केले. आज तिच्या वाढदिवशी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
3 / 9
जिच्या एका स्माईलवर लाखो फिदा होतात ती माधुरी दीक्षित. माधुरीने 1984 साली 'अबोध' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र फिल्म काही फारशी चालली नाही. यामुळे तिने पुन्हा शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. दरम्यान 1988 साली आलेल्या 'तेजाब' सिनेमामुळे तिचं नशीब चमकलं. यानंतर तिने मागे वळून बघितलं नाही.
4 / 9
'तेजाब' नंतर माधुरीने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. कधी नायिका तर कधी खलनायिकेच्याही भूमिकेत ती दिसली. शिवाय तिच्या डान्सचे तर लाखो चाहते होते आणि आजही आहेत.
5 / 9
करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना अचानक माधुरीने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. अमेरिकेत स्थायिक असलेले डॉ श्रीराम नेने यांच्याशी तिने लग्न केले. मात्र त्यांची ओळख नेमकी कशी झाली?
6 / 9
माधुरी आणि श्रीराम नेने यांची भेट लॉस एंजेलिस येथे एका पार्टीत झाली होती. त्यावेळी नेने यांना माधुरी बॉलिवूडची मोठी स्टार आहे हे माहितही नव्हतं. त्यांना थोडी देखील कल्पना नव्हती. हे बघून तिला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला.
7 / 9
डॉ नेने यांनी माधुरीला विचारलं की माझ्यासोबत डोंगरदऱ्यात बाईक राईडवर येशील का. माधुरीला वाटलं बाईक आहे म्हणल्यावर सोप्पं असेल पण तिथे गेल्यावर तिला कळलं की हे किती अवघड आहे. तेव्हापासूनच दोघं एकमेकांच्या जवळ आले आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलले.
8 / 9
काही वर्ष डेट केल्यानंतर 17 ऑक्टोबर 1999 साली दोघंही लग्नबंधनात अडकले. यानंतर माधुरीने सिनेसृष्टीला रामराम केला आणि ती कायमची अमेरिकेत स्थायिक झाली.
9 / 9
माध्यम रिपोर्ट्सनुसार माधुरीची एकूण संपत्ती 250 कोटी आहे. ती एका फिल्मसाठी 4 ते 5 कोटी रुपये घेते. तसंच ब्रँड्स आणि जाहिरातींमधूनही ती बक्कळ पैसे कमावते. रिएलिटी शो जज करण्यासाठी ती 25 कोटी घेतेय. माधुरीकडे अनेक लक्झरी गाड्याही आहेत.
टॅग्स :माधुरी दिक्षितनृत्यपरिवारपती- जोडीदारदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट