‘हा’ स्टंट केला अन् विशाल देवगणचा अजय देवगण झाला; वाचा अजयचा एक थरकाप उडविणारा किस्सा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 15:06 IST
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याचा नुकताच रिलीज झालेला ‘बादशाहो’ला प्रेक्षकांचा अजूनही प्रतिसाद मिळत आहे. अजय देवगण या चित्रपटात त्याच्या ...
‘हा’ स्टंट केला अन् विशाल देवगणचा अजय देवगण झाला; वाचा अजयचा एक थरकाप उडविणारा किस्सा !
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याचा नुकताच रिलीज झालेला ‘बादशाहो’ला प्रेक्षकांचा अजूनही प्रतिसाद मिळत आहे. अजय देवगण या चित्रपटात त्याच्या जुन्या अंदाजात बघावयास मिळत आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाबरोबरच त्याचे डायलॉग्सही आवडत आहेत. वास्तविक अजयला इंडस्ट्रीत त्याच्या स्टंटकरिता ओळखले जाते. त्याने आतापर्यंत त्याच्या चित्रपटात अनेक खतरनाक स्टंट केले आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की, एक स्टंट करताना अजय चांगलाच घाबरून गेला होता. त्याला असे वाटू लागले की, हा स्टंट माझा पहिला आणि अखेरचा तर ठरणार नाही ना? मात्र त्याने हा स्टंट केला अन् विशाल देवगणचा तो अजय देवगण झाला. हा किस्सा २२ नोव्हेंबर १९९१ मध्ये आलेल्या अजय देवगणच्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटाअगोदर अजयला विशाल देवगण या नावानेच ओळखले जात होते. परंतु त्याने या चित्रपटात असा काही एक स्टंट केला की, त्याचे नावच बदलून गेले. पुढे त्याला अजय देवगण या नावाने ओळखले जाऊ लागले. हा चित्रपट अजयला जेवढा स्पेशल होता, तेवढाच दिग्दर्शक कूकू कोहली यांच्यासाठीही स्पेशल होता. कारण कूकू कोहलीदेखील इंडस्ट्रीत नवे होते. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर एवढा हिट ठरला होता की, तीन कोटी रुपयांमध्ये बनविलेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तब्बल १२ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘फूल औ कांटे’मध्ये अजय देवगणची एंट्री कूकूला विशेष करायची होती. दोन धावत्या बाईकवर पाय ठेवून अजयची त्याला एंट्री दाखवायची होती. हा स्टंट करण्यासाठी सुरुवातीला अजय घाबरला होता. परंतु धाडस करून त्याने हा स्टंट केला. पुढे त्याला या स्टंटने रातोरात स्टार बनविले. कारण हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अजयचा हा स्टंट लहानापासून मोठ्यांपर्यंत हिट झाला. आजही त्याचा हा स्टंट लोकांच्या स्मरणात आहे. अर्थात त्याने या स्टंटची पुढे काही चित्रपटांमध्ये कॉपीही केली आहे. असो, अजयने ‘स्टार भारत’ या नव्या टीव्ही चॅनेलच्या जाहिरातीत या स्टंटविषयी बोलताना म्हटले की, ‘माझ्या पहिल्या चित्रपटातील तो बाइक स्टंट तुम्हाला कदाचित आठवत असेल. बाइक्स दोन होत्या आणि मी एकटा होतो. त्यामुळे मी प्रचंड घाबरून गेलो होते. एका क्षणासाठी माझ्या मनात हा विचार आला की, हा चित्रपट आणि हा स्टंट माझा पहिला आणि अखेरचा तर ठरणार नाही ना? पण काहीही असो जर मी त्यावेळी तो स्टंट करायला घाबरलो असतो तर आज जो मी आहे तो कदाचित नसतो.’ पण काहीही असो, अजयने तो स्टंट करून बी-टाऊनमध्ये धूम उडवून दिली होती. अजयने त्याच्या आगामी गोलमाल सीरिजमध्ये त्याच स्टंटचा फॉर्म्युला वापरला आहे. फरक एवढाच की त्यावेळेस तो बाइकवर आला होता, आता तो चारचाकीवर हा स्टंट करताना दिसणार आहे.