Join us
Daily Top 2Weekly Top 5

२५ व्या वर्षी अभिनेत्रीच्या नशिबी आलं वैधव्य; मग २२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत थाटला दुसरा संसार, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 09:07 IST

1 / 10
अभिनेत्री लीना चंदावरकर सत्तरच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. लीना बिदाई, हमजोली, मंचली, मेहबूब की मेहंदी इत्यादी अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, जिथे लीनाचे नाणे चित्रपटांमध्ये यशस्वी ठरले, तिथे खऱ्या आयुष्यात तिची कहाणी एखाद्या दुःखद चित्रपटापेक्षा कमी नव्हती.
2 / 10
आज आम्ही तुम्हाला या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगणार आहोत.
3 / 10
लीना यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक चढउतार आले. त्यांना लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. पण त्यांच्या कुटुंबियांची यासाठी परवानगी नव्हती. पण त्यांनी एका टॅलेंट हंट मध्ये भाग घेतला आणि त्यांची निवड झाली. पण त्या वयाने खूपच लहान असल्याने त्यांना चित्रपटांमध्ये भूमिका मिळत नव्हत्या.
4 / 10
त्यांना सुनील दत्त आणि नर्गिस यांनी चित्रपटात काम करण्याची संधी दिली. अभिनयक्षेत्रात यश मिळत असतानाच वयाच्या केवळ २५ व्या वर्षी त्यांचे लग्न सिद्धार्थ बंडोडकरसोबत झाले. सिद्धार्थ हे एका राजकीय कुटुंबातील होते. पण लग्नाच्या अवघ्या ११ व्या दिवशी सिद्धार्थ यांना चुकून गोळी लागली.
5 / 10
त्यानंतर कित्येक महिने रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांचे निधन झाले. यानंतर लीना नैराश्यात गेल्या होत्या. त्यांनी लोकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे बंद केले होते. त्यामुळे त्यांच्या पालकांनी त्यांना माहेरी आणले.
6 / 10
लहान वयातच विधवा झालेल्या लीना चंदावरकर यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली होती. लीना यांनी काही महिन्यानंतर पुन्हा चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.
7 / 10
याच दरम्यान त्यांची ओळख किशोर कुमार यांच्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
8 / 10
पण त्यांच्या लग्नाला लीना यांच्या वडिलांचा प्रचंड विरोध होता. किशोर कुमार आणि लीना यांच्यात २२ वर्षांचे अंतर होते. तसेच किशोर कुमार यांची तीन लग्न झालेली होती. पण वडिलांच्या विरोधाला न जुमानता लीना यांनी १९८० मध्ये किशोर यांच्यासोबत लग्न केले.
9 / 10
लीना चंदावरकर या गायक किशोर कुमार यांच्या चौथ्या पत्नी होत्या. मात्र, इथेही काही वेगळे होऊ दिले. लग्नाच्या ७ वर्षानंतर १९८७ मध्ये किशोर कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लीना पुन्हा एकदा एकट्या पडल्या.
10 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किशोर कुमार यांच्या मृत्यूच्या वेळी लीना ३७ वर्षांच्या होत्या. लीना आता आपल्या मुलांसोबत मुंबईत राहतात. लीना यांना आता ओळखणं कठीण झाले आहे.
टॅग्स :सेलिब्रिटी