Join us
Daily Top 2Weekly Top 5

एंटरटेनमेंट का फुल डोज! मूड फ्रेश करायण्यासाठी वीकेंडला बघा या नव्या वेबसीरिज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 15:34 IST

1 / 5
आर्या- डिज्नी प्लस हॉटस्टारवर ‘आर्या’ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली. यात सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत आहे. तिने यात लेडी डॉनची भूमिका साकारली आहे. पाच वर्षांनंतर सुश्मिताने अभिनयाच्या दुनियेत कमबॅक केले आहे. तिचे चाहते असाल तर ही वेबसीरिज तुमच्यासाठी आहे.
2 / 5
रसबरी- स्वरा भास्करची ही वेबसीरिज सध्या जाम चर्चेत आहे. एक विद्यार्थी त्याच्या इंग्रजी टीचरच्या प्रेमात पडतो असे कथानक असल्याने ही वेबसीरिज काहीसी वादात सापडली आहे.
3 / 5
कसिनो - करणवीर बोहराने या वेबसीरिजच्या माध्यमातून डिजिटल डेब्यू केला आहे. या सीरिजमध्ये कसिनोवरून सुरु असलेल्या एका कौटुंबिक वादाची कथा आहे.
4 / 5
लाल बाजार- झी-5 वर रिलीज या वेबसीरिजमध्ये रेड लाइट एरियात झालेला एका मर्डरची कथा आहे. मर्डर झाल्यानंतर पोलिस तपास सुरु करतात आणि यानंतर एकापाठोपाठ एक हत्येचे सत्र सुरु होते. मारेकरी पोलिसांना आव्हान देतो. या मारेक-यापर्यंत पोलिस कसे पोहोचतात, त्याची ही कथा आहे.
5 / 5
पती पत्नी और वो - या नावाचा सिनेमा तुम्ही पाहिला असेलच. आता या नावाची वेबसीरिजही तुम्ही पाहू शकता. एमएक्स प्लेअरवर रिलीज ही वेबसीरिज एक हॉरर सीरिज आहे.
टॅग्स :वेबसीरिज