Join us  

आईची ओढणी, आजीचा हार...; क्रिती खरबंदाच्या लूकमागे आहे खास आठवण! सुंदर पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 3:42 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) नुकतीच लग्नबंधनात अडकली. अभिनेता पुलकीत सम्राटसोबत (Pulkit Samrat) तिने लग्नगाठ बांधली. हे गोड कपल अखेर कायमचं बेडीत अडकलं.
2 / 8
क्रिती आणि पुलकीत गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे रोमँटिक, क्युट फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय होते. आता अखेर त्यांनी आयु्ष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतली.
3 / 8
क्रिती आणि पुलकीतचा ग्रँड विवाह पंजाबी पद्धतीने दिल्ली मध्ये पार पडला. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये त्यांच्या प्रीवेडिंग आणि वेडिंग असं दोन्ही झालं. याचे फोटो नंतर सोशल मीडियावर झाले. त्यात नवरा नवरी खूप खूश दिसत होते.
4 / 8
क्रितीच्या चुडा सेरेमनीवेळी तिने खास काय परिधान केलं होतं यामागची गोष्ट तिने नुकतीच चाहत्यांसोबत शेअर केली. या सेरेमनीसाठी तिने हिरव्या रंगाची साडी आणि स्टायलिश ब्लाऊज घातला होता. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
5 / 8
क्रितीच्या चूडा सेरेमनी लूकमधील खास गोष्ट म्हणजे आईची ओढणी आणि आजीचा सोन्याचा हार. तिने आईची ओढणी डोक्यावर घेतली आहे तर गळ्यात जो हार आहे तो तिच्या आईच्या आईचा म्हणजेच आजीचा आहे.
6 / 8
या दोन्ही गोष्टी ती तिच्या लग्नाच्या फंक्शन्समध्ये घालणार हे तिने लहानपणीच ठरवलं होतं असंही ती म्हणाली. म्हणजेच जेव्हा ना मुलगा होता ना कोणतं प्रपोजल तेव्हापासूनच तिचं या दोन्ही गोष्टी चुडा सेरेमनीसाठी घालायच्या यावर ती ठाम होती.
7 / 8
ती पोस्टमध्ये असंही म्हणाली की लाल चूडा आणि कलीराही खूप आवडला. तिच्या चूडावर लग्नाशी संबंधित काही ओळी लिहिण्यात आलेल्या दिसत आहेत.
8 / 8
क्रितीने 'शादी मे जरुर आना' या सिनेमात राजकुमार रावबरोबर काम केलं होतं. त्यांचा हा सिनेमा खूप गाजला होता. तर पुलकीतचा 'फुकरे' सिनेमा सुपरहिट झाला. 'वीरे की वेडिंग' सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं आहे.
टॅग्स :कृति खरबंदासेलिब्रिटीलग्नव्हायरल फोटोज्सोशल मीडिया