Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिश्मा कपूरचा ऑनस्क्रीन मुलगा आता ओळखूही येईना, कुठे आहे 'हा' क्युट चिमुकला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 11:34 IST

1 / 7
२००२ साली आलेल्या 'शक्ती: द पॉवर' सिनेमात करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांची जोडी होती. तर नाना पाटेकर खलनायकाच्या भूमिकेत होते.
2 / 7
सिनेमात करिश्माच्या मुलाच्या भूमिकेत दिसलेला तो क्युट मुलगा आठवतोय? गोरा पान, घारे डोळे आणि गोड स्माईल करणारा हा मुलगा आता कसा दिसतो आणि काय करतो? वाचा
3 / 7
'शक्ती'मध्ये या चिमुकल्याने 'राजा'ही भूमिका साकारली होती. राजाला घेऊन करिश्मा गावी तिच्या सासरी येते.तिथे तिचा सासरा म्हणजे नाना पाटेकर गुंड असतात. ते 'राजा'ला वाईट सवयी लावायचा प्रयत्न करत असतात. करिश्मा लेकाला कशी त्यांच्या ताब्यातून वाचवते याची ही थरारक कथा आहे.
4 / 7
छोट्या राजाची भूमिका साकारणारा हा अभिनेता आहे जय गिडवानी. जय आता सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे. त्याने अभिनयाला रामराम करत वेगळा मार्ग निवडला.
5 / 7
मीडिया रिपोर्टनुसार, जय स्पेनमधील ग्रेन कैनारिया या सुंदर शहरात स्थायिक झाला आहे. तिथे त्याचा बिझनेस असून आज तो डॉलरमध्ये कमवत आहे.
6 / 7
जयची लाईफस्टाईलही शानदार आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलची झलक दिसते.
7 / 7
जयच्या लूकबाबतीत बोलायचं तर तो अभिनेत्यांनाही टक्कर देईल इतका हँडसम आहे. जय डिजीटल क्रिएटरही आहे. इन्स्टाग्रामवर तो दैनंदिन आयुष्यातील अनेक रील्स शेअर करत असतो.
टॅग्स :करिश्मा कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी