Join us

करिना कपूरच्या ‘या’ पाच अवतारांची चाहत्यांवर मोहिनी, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST

बेबो करिना कपूर एका मुलाची आई झाली असली तरी, तिचा जलवा तसुभरही कमी झाला नाही. कारण आजही तिची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर असतात. बॉलिवूडमध्ये फॅशनचे एकापेक्षा एक ट्रेण्ड रूजू करणाºया करिनाचे पाच अवतार मात्र असे आहेत, जे तिचे चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. आजही या अवतारातील तिचा लूक बघून चाहते दिवाने होतात.

बेबो करिना कपूर एका मुलाची आई झाली असली तरी, तिचा जलवा तसुभरही कमी झाला नाही. कारण आजही तिची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर असतात. बॉलिवूडमध्ये फॅशनचे एकापेक्षा एक ट्रेण्ड रूजू करणाºया करिनाचे पाच अवतार मात्र असे आहेत, जे तिचे चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. आजही या अवतारातील तिचा लूक बघून चाहते दिवाने होतात. रिफ्यूजीबॉलिवूडमध्ये असे खूपच कमी वेळा बघावयास मिळते की, एखाद्या कलाकाराने त्याच्या पहिल्याच चित्रपटात छाप सोडली आहे. करिनाने २००० मध्ये आलेल्या ‘रिफ्यूजी’मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. परंतु तिचा पहिलाच लूक चाहत्यांना पर्यायाने तिच्या करिअरला उड्डाण देणारा ठरला. या चित्रपटाला तिचा लूक आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.चमेलीचमेली या चित्रपटात बेबी डॉल करिनाने खूपच सुंदर अशा प्रॉस्टीट्यूटची भूमिका साकारून सगळ्यांनाच चकित केले. प्रेक्षकांना तिची ही भूमिका खूपच आवडली होती.ओमकारा२००६ मध्ये आलेल्या ओमकारा या मल्टीस्टारर चित्रपटात करिनाचा अंदाज बघण्यासारखा होता. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान आणि विवेक ओबेरॉयसारखे भारदस्त कलाकार होते, परंतु अशातही करिनाने स्वत:ची छाप सोडली होती.कभी खुशी कभी गमकरिनाच्या फिल्मी करिअरची जेव्हा-जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा-तेव्हा ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाचा उल्लेख केला जातो. कारण चित्रपटातील तिची भूमिका खूपच पसंत करण्यात आली होती. तिने काजोलच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती.जब वी मेटगीत नावाची भूमिका साकारून करिनाने चाहत्यांना मोहिनी घातली होती. इम्तियाज अलीच्या या चित्रपटात करिनाचा लूक बघण्यासारखा होता.