Join us

Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:13 IST

1 / 8
अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या अफेअरबद्दल सर्वांनाच माहीत आहे. करीनाने डेटिंगच्या दिवसामध्ये आपलं प्रेम कसं व्यक्त केलं ते आता समोर आलं आहे.
2 / 8
करीना शाहिदच्या मागे वेडी झाली होती आणि तिनेच स्वत: ही गोष्ट सांगितली आहे. करण जौहरच्या चॅट शोमध्ये दोघांनाही इनव्हाईट करण्यात आलं होतं.
3 / 8
अभिनेत्री आता सैफ अली खानची पत्नी आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा ती शाहिदवर प्रचंड प्रेम करायची. तीच त्याच्या मागे लागल्याचं देखील तिने म्हटलं आहे.
4 / 8
करीनाने करण जौहरच्या शोमध्ये शाहिदच्या समोरच म्हटलं होतं की, 'त्याला काहीच फरक पडायचा नाही. मी दोन महिने शाहिदच्या मागे लागली होती.'
5 / 8
'मी पहिली व्यक्ती होती, जी इतका इंट्रेस्ट घेत होती आणि पुढे जात होती. मी त्याला खूप सारे SMS करायची. मी कॉल करून त्याला भेटूया असं म्हणायची.'
6 / 8
करणने यावर शाहिदची रिएक्शन विचारताच शाहिद खूप लाजला. करीना आणि शाहिदचं ब्रेकअप होऊन आता खूप जास्त वर्षे झाली आहे. दोघंही आपल्या आयुष्यात खूश आहेत.
7 / 8
करीनाने सैफ अली खानशी लग्न केलं आहे. शाहिद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केलं. दोघांनाही आता दोन मुलं आहेत.
8 / 8
करीना आणि शाहिद दोघंही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच त्यांचे फोटो शेअर करत असतात. दोघांचेही असंख्य चाहते आहेत.
टॅग्स :करिना कपूरशाहिद कपूरबॉलिवूड