By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 08:00 IST
1 / 11 बेबो अर्थात करिना कपूर ही बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री. बेबोचे रोज नवे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. बॉलिवूडच्या पार्ट्यांमधल्या, फॅमिली फंक्शनमधल्या तिच्या फोटोंचीही चर्चा होते. कपूर घराण्याची ही बिनधास्त लेक तिच्या वादांमुळेही चर्चेत असतेच. सुमारे दोन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये असलेल्या करिनाने स्वत:ला सिद्ध केले.2 / 11 गेल्या 20 वर्षांत करिनात प्रचंड बदल झाला आहे. तिचे जुने आणि आत्ताचे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आज करिना तिचा वाढदिवस साजरा करतेय. तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिचे जुने फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.3 / 112000 साली ‘रिफ्युजी’या चित्रपटातून करिनाचा बॉलिवूड डेब्यू झाला. या चित्रपटात तिचा हिरो होता अभिषेक कपूर. त्याचाही हा पहिलाच सिनेमा होता. या पहिल्या सिनेमापासून आत्तापर्यंत करिनाने एकापेक्षा एक भूमिका साकारल्या.4 / 11 करिनाचा पहिला सिनेमा अभिषेकबरोबर असला असता तरी तिला हृतिक रोशनच्या सिनेमातून डेब्यू करायची इच्छा होती. ‘कहो ना प्यार है’ मध्ये ती लीड अॅक्ट्रेस म्हणून दिग्दर्शकाची पहिली पसंती होती. तिने हा सिेनेमा साईनही केला होता. पण नंतर आईच्या नकारघंटेमुळे करिनाने हा सिनेमा अर्ध्यावर सोडला. मग हा सिनेमा अमिषा पटेलला मिळाला.5 / 11चित्रपटातील लुकसाठी करिनाने वेगवेगळे प्रयोग केलेत. ‘टशन’ या चित्रपटावेळी करिनाच्या झिरो फिगर लुकने सर्वांना घायाळ केलं होतं. या सिनेमातील छलिया गाण्यात मधील तिच्या बिकिनी लुकवरुन तिला ट्रोल करण्यात आलं होतं. पण नंतर करिनामुळे झिरो साइजची के्रझ निर्माण झाली होती. 6 / 11करिनाचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी झाला होता. करिना आणि तिची मोठी बहीण करिश्माला आई बबिताने मोठ्या प्रेमानं वाढवलं. पण करिना मुळातच लहानपणापासून खोडकर. एकदा तिने अशीच एक मोठी चूक केली आणि आईनं थेट डेहराडूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये तिची रवानगी केली.7 / 11तुम्हाला कदाचित माहित नसेल पण करिनाचं खरं नाव करिना नाही. तिचे आजोबा म्हणजे बॉलिवूडचे शो मॅन राजकपूर यांनी तिचं नाव सिद्धिमा ठेवलं होतं. पण आईने तिचं करिना असं नामकरण केलं. करिना हे नाव ‘अन्ना करेनिना’ या पुस्तकातून घेण्यात आलं आहे. हे पुस्तक तिच्या आईने प्रेग्नेंसीवेळी वाचलं होतं. करिनाला तिचे कुटुंबीय आणि मित्र बेबो म्हणतात. वडील रणधीर कपूर यांनी तिला हे नाव दिलं होतं.8 / 11करिनाचा जन्म एका रॉयल कुटुंबात झाला आहे. त्यामुळे तिचे लहानपण श्रीमंतीत गेलं असेल, असाच सर्वांचा समज आहे. पण बेबोला बालपणी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिची मोठी बहीण करिश्मा ही कॉलेजला जाण्यासाठी लोकल ट्रेनचा प्रवास करायची तर करिना स्कूल बसने शाळेला जात. त्यांच्याकडे एक कारही नव्हती. 9 / 11वर्ष 2007 मध्ये शाहिद कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर करिनानंसैफशी डेट करण्यास सुरुवात केली होती. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. डेटिंग करताना दोघं फिरायला जात तेव्हा ते नेहमी हॉटेलमध्ये चेक इन करताना मिस्टर अँड मिसेस खान नावाने करत असत.10 / 11करिना व सैफची पहिली भेट विशाल भारद्वाज यांच्या ‘ओंकारा’च्या सेटवर झाली होती. या सिनेमात सैफने लंगडा त्यागीची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या सेटवर सैफ व करिना पहिल्यांदा भेटले होते. तेव्हा सैफ दुस-या मुलीला डेट करत होता आणि करिनाही शाहिदच्या प्रेमात होती. त्यामुळे सेटवर सैफ व करिना अगदी क्वचित बोलत. केवळ हाय-हॅलो इतके जुजबी.11 / 11करिनाचे मानाल तर, या नात्यात तिनेच पुढाकार घेतला होता. तिने पहिल्यांदा सैफसमोर प्रेम व्यक्त केले तेव्हा क्षणभर सैफलाही विश्वास बसेना. करिनाच्या मते, सैफ असा पुरूष आहे, ज्याच्या कुणीही प्रेमात पडेल. तो एकदम जेंटलमॅन आणि आपल्याच कोशात वावरणारा आहे. तो कधीच स्वत:कडून कोणत्याही महिलेच्या जवळ जाणार नाही. मी स्वत: पुढाकार घेतला आणि आमचे रिलेशनशिप पुढे गेले.