Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा जज करण्यासाठी उर्वशी रौतेलानं किती फी घेतली माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 14:10 IST

1 / 7
भारताच्या हरनाज संधूनं ‘मिस युनिव्हर्स’चा ताज जिंकला आणि भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होती. कारण ‘मिस युनिव्हर्स 2021’ची परीक्षकांपैकी एक होती.
2 / 7
होय, मिस युनिव्हर्स स्पर्धेची परीक्षक होण्याचा मान यंदा उर्वशीला मिळाला होता. या स्पर्धेच्या नामांकित परीक्षकांपैकी ती एक होती.
3 / 7
‘मिस युनिव्हर्स’चा ताज जिंकणा-या सौंदयवतीवर बक्षिसांचा वर्षाव होता. तशीच ही स्पर्धा जज करणाºयांनाही घसघशीत रक्कम मिळते. उर्वशीलाही यासाठी मोठी फी मिळाली होती.
4 / 7
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही स्पर्धा जज करण्यासाठी उर्वशीला 1.2 मिलियन डॉलर इतकी रक्कम मिळाली होती. भारतीय रूपयांत सांगायचं तर सुमारे 8 कोटी रूपये.
5 / 7
उर्वशी तिच्या चित्रपटासाठीही एवढी फी घेत नाही. पण या स्पर्धेसाठी तिला मोठी रक्कम मिळाली. सोबत तिने देशाचा गौरवही वाढवला.
6 / 7
उर्वशी रौतेलाच्या नावे अनेक सौंदर्य स्पर्धांचं किताब आहेत. उर्वशीने ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत 2015 साली भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यावेळी तिने ‘मिस दिवा युनिव्हर्स’ हा खिताब जिंकला होता.
7 / 7
2013 मध्ये ‘सिंग साब द ग्रेट’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती सनम रे, ग्रेट गँड मस्ती, हेट स्टेरी 4 आणि पागलपंती अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली.
टॅग्स :उर्वशी रौतेलामिस युनिव्हर्स