By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 16:15 IST
1 / 12रोमानियाची टीव्ही प्रेजेंटर आणि मॉडल यूलिया वेंतूर आता भारताच्या रंगात चांगलीच रंगलेली बघायला मिळते. ती हिंदी सिनेमात दिसण्यासोबत हिंदी गाणीही गात आहे. तिचं नाव निघताच आपोआप सलमान खानचं नाव येतं. आज यूलियाचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊ तिची आणि सलमानची भेट झाली कशी...2 / 12रिपोर्ट्सनुसार सलमान खान आणि यूलियाची पहिली भेट डबलिनमध्ये २०१० मध्ये झाली होती. सलमान तिथे बॉडीगार्ड सिनेमाचं शूटींग करत होता. यूलिया त्याला भेटण्यासाठी सेटवर गेली होती. त्यावेळी यूलिया ही Marius Moga ला डेट करत होती.3 / 12Marius हा म्युझिशिअन आहे आणि मीडिया रिपोर्टनुसार सलमानला 'तेरी मेरी मेरी तेरी' गाण्याचे रोमानियन राइट्स मिळवून देण्यात त्याने मदत केली होती. हे एक रोमानियन गाणं होतं जे हिमेश रेशमियाने अडॉप्ट केलं होतं.4 / 12तसेच काही रिपोर्ट्समध्ये असंही सांगितलं जातं की, यूलिया सलमानला पहिल्यांगा रोमानियात भेटली होती. सलमान तिथे सोहेलच्या सिनेमाबाबत गेला होता.5 / 12असे सांगितले जाते की, पहिल्याच भेटीत सलमान आणि यूलिया यांच्यात चांगली मैत्री झाली होती. यूलिया मॉडल होती आणि सलमानने तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा सल्लाही दिला होता. यूलिया तिच्या बॉयफ्रेन्डसोबत मुंबईला आली आणि काही दिवसातच दोघांचं ब्रेकअप झालं.6 / 12काही चर्चा अशीही होती की, यूलिया आणि Marius यांचं लग्न झालं आहे. पण यूलियाने या गोष्टी अफवा असल्याचं सांगितलं. बॉलिवूड लाइफच्या एका रिपोर्टनुसार, २०१२ मध्ये ती पुन्हा भारतात आली. 7 / 12तिने इथे अनेक सिनेमांसाठी ऑडिशन दिली. दरम्यान इथे थांबण्याची तिची व्यवस्था सलमानने केली होती. ती त्याच्या पनवेलच्या फार्म हाउसवर थांबली होती.8 / 12रोमानियातील एका टॅब्लॉइडने यूलियाला रॉयल मिसेज खान म्हटलं होतं. तिथे चर्चा होती की, यूलिया सलमानसोबत लग्न करून भारतात स्थायिक झाली आहे.9 / 12मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूलियाला जेव्हा बॉलिवूडमध्ये जेव्हा काही चांगलं काम मिळालं नाही तेव्हा तिला 'ओ तेरी' सिनेमात एक आयटम सॉंग दिलं. यासाठी तिला चांगलीच रक्कम मिळाली होती. असे मानले जाते की, सोबत काम केल्यावर सलमान आणि तिच्यात जवळीकता वाढली होती.10 / 12यूलिया आणि सलमान पब्लिकमध्ये एकत्र दिसू लागले. त्यामुळे त्यांच्या अफेअरची चर्चाही होऊ लागली. एक वेळ होती की, जेव्हा दोघांच्या लग्नाची चर्चाही होती. तेव्हा सलमान म्हणाला होता की, लपून लग्न नाही करणार. तसं काही असेल कर सांगून करणार.11 / 12नुकतीच यूलिया म्हणाली होती की, एखाद्यासोबत जीवन जगणं कागदोपत्री लग्नापेक्षा जास्त महत्वाचं आहे. ती म्हणाली होती की, फक्त लग्न करून काही होत नाही, कुणासोबत तरी आनंदाने राहणं महत्वाचं आहे.12 / 12