Join us
Daily Top 2Weekly Top 5

करियर फ्लॉप होताच अभिनेत्रीने बॉलिवूडला केला रामराम, पण नशीबानं दिली साथ, आज जगतेय आलिशान जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 08:00 IST

1 / 9
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी करिअर फ्लॉप होताच बॉलिवूडला रामराम केला. अशाच एका अभिनेत्रीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिचं करिअर फ्लॉप झालं म्हणून बॉलिवूडलं सोडलं मात्र तिला नशीबाची साथ मिळाली.
2 / 9
आज ही बॉलिवूडची अभिनेत्री कोट्यधीश असून पूर्वीपेक्षा जास्त ग्लॅमरस दिसतेय.
3 / 9
आम्ही बोलतोय बॉलिवूडची 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकर बाबत. ईशा आज तिचा ४७ वा वाढदिवस साजरा करते आहे. तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले. गर्लफ्रेंड, एक विवाह ऐसा आणि डॉन यांसारख्या चित्रपटातून तिला विशेष ओळख मिळाली.
4 / 9
१९ सप्टेंबर १९७६ मध्ये मुंबईतील एका कोकणी कुटुंबात इशाचा जन्म झाला. अभिनयाची आवड असणाऱ्या इशाने मॉडलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. 'प्यार इश्क और मोहब्बत' या चित्रपटात झळकलेल्या इशाला 'कंपनी' या चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर ती रातोरात सुपरस्टार झाली.
5 / 9
इशाने डॉन, सलाम-ए-इश्क, क्या कूल हैं हम, हम तुम, कंपनी, पिंजर, कृष्णा कॉटेल या चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु, अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने अचानकपणे कलाविश्वातून काढता पाय घेतला.
6 / 9
जवळपास १० वर्ष कलाविश्वात काम केल्यानंतर सिनेसृष्टीला रामराम करणारी ही अभिनेत्री आज कोट्यवधींची मालकीन असल्याचं पाहायला मिळतं.
7 / 9
इशाने २९ नोव्हेंबर २००९ मध्ये प्रसिद्ध उद्योगपती टिम्मी नारंग यांच्यासोबत लग्न केलं. टिम्मी नारंग हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचा मोठा बिझनेस आहे.
8 / 9
अभिनेत्री प्रिती झिंटामुळे टिम्मी आणि इशा यांची भेट झाली होती. त्यानंतर या भेटीचं मैत्रीत आणि पुढे प्रेमात रुपांतर झालं.
9 / 9
इशा आणि टिम्मी यांना एक लहान मुलगी असून रियाना असं तिचं नाव आहे.
टॅग्स :इशा कोप्पीकर