IN PICS : सामंथा रूथ प्रभूच्या हाती दिसलं पुस्तक; लोकांनी काढला भलताच अर्थ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 17:20 IST
1 / 8साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभू सध्याची सर्वात चर्चित अभिनेत्री आहे. या ना त्या कारणाने सामंथा चर्चेत असते. सध्या मात्र तिच्या एअरपोर्टवरच्या फोटोंनी वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलं आहे.2 / 8द फॅमिली मॅन आणि पुष्पा या चित्रपटातील आयटम सॉन्गच्या बम्पर यशानंतर सामंथा रूथ प्रभु आपल्या पॅन इंडिया प्रोजेक्टमध्ये बिझी आहे.3 / 8या प्रोजेक्टमुळे हैदराबाद ते मुंबई अशा तिच्या वाऱ्या सुरू आहेत. काल सामंथा मुंबई एअरपोर्टवर दिसली आणि एअरपोर्टवरचे तिचे फोटो क्षणात व्हायरल झालेत.4 / 8खास म्हणजे, हे फोटो पाहून अनेकांनी वेगळाच तर्क काढला. काय तर सामंथा डिप्रेशनमध्ये आहे. होय,सामंथा डिप्रेशनमध्ये आहे, असं लोक बोलायला लागले.5 / 8 एअरपोर्टमधून बाहेर पडताना सामंथाच्या हातात एक पुस्तक दिसलं. ‘यू कॅन हील युवर लाईफ’ असं पुस्तकाचं नाव बघून लोकांनी हा अंदाज बांधला.6 / 8सामंथा डिप्रेशनमध्ये आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सेल्फ हेल्प बुक वाचतेय, असा तर्क अनेकांनी काढला. काहींनी तर सामंथाबद्दल चिंता व्यक्त केली.7 / 8नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटानंतर सामंथा अद्यापही सावरू शकलेली नाही, असं चाहत्यांचं म्हणणं आहे आणि सामंथाच्या हातातील पुस्तकाने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.8 / 8गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यांत सामंथाने नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती.