Join us
Daily Top 2Weekly Top 5

पडद्यावरील खाष्ट सासू! अभिनय असा की नजरेने नायिका व्हायची गपगार, 'या' अभिनेत्रीने बदलली 'खलनायिके'ची व्याख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:23 IST

1 / 8
हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये खाष्ट सासूचं पात्र म्हटलं की, आपसूकच डोळ्यासमोर एकच चेहरा उभा राहतो तो म्हणजे ललिता पवार. आज २४ फेब्रुवारी रोजी ललिता पवार यांचा स्मृतिदिन...
2 / 8
पांढरी बंगाली जरीच्या काठाची साडी, सासूच्या रोलचा कडक शिस्तीचा किंवा वाकडेपणाचा ताठा दाखवणारी तसेच डायलॉग बोलताना डोळ्यांतून ओसंडून वाहणारा मत्सर किंवा राग, आवाजाची धार समोरच्या सून म्हणून उभ्या राहणार्‍या हिरॉइनला सुनसान करणारी ताकद फक्त या अभिनेत्रीमध्येच होती.
3 / 8
येवल्याच्या रेशमी कपड्याचे व्यापारी लक्ष्मणराव सगुण यांच्या घरी १९ एप्रिल १९१६ साली कन्या जन्मली. वयाच्या सातव्या वर्षी घराशेजारी चालणार्‍या मूकपटाचे चित्रीकरण बघण्यासाठी भिंतीवर चढली होती आणि चित्रीकरण वाकून वाकून बघताना तोल जाऊन कॅमेर्‍यासमोर पडली. अर्थात, त्या वेळी भारतीय चित्रपटामध्ये आपले नाव अजरामर करणारी अभिनेत्री कॅमेर्‍यासमोर आली आहे, हे कोणाला माहित नव्हतं. ललिता पवार याचं पूर्वाश्रमीचं नाव अंबा हे होतं.
4 / 8
चित्रपटांमध्ये खाष्ट सासू साकारणारी ही अभिनेत्री कधीकाळी स्टंटपटांची हिरॉइन आणि हीरोला भुलवणारी मदनमस्त मेनका किंवा आजच्या भाषेत ‘आयटम गर्ल’ होती, हे सांगूनही कुणाला पटणार नाही. ललिता पवार यांनी त्यांचा पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' मध्ये काम केले तेव्हा त्या फक्त नऊ वर्षांच्या होत्या. हा चित्रपट १९२८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या काळात भारतात मूकपट बनवले जात होते.
5 / 8
न्यू हंस पिक्चरचा ‘संत दामाजी’, भालजी पेंढारकरांचा ‘नेताजी पालकर’, वि. स. खांडेकरांनी लिहिलेला ‘नवयुग पिक्चर’चा ‘अमृत’, छाया पिक्चरचा ‘गोरा कुंभार’, 1944चा प्रभातचा ‘रामशास्त्री’-त्यामधील ‘ध’चा ‘मा’ करणारी आनंदीबाई असे एक नव्हे, तर सात दशकांच्या कारकीर्दीमधील एकूण 700 सिनेमे यांच्या नावावर आहेत.‘रामायण’ मालिकेत ‘मंथरे’चं पात्र अभिनेत्री ललिता पवार यांनी साकारलं होतं.
6 / 8
‘जंग-ए-आझादी’ चित्रपटाच्या वेळी विठ्ठलने मारलेल्या लाफ्याने ललिताच्या डोळ्याजवळील नस दुखावली गेली आणि तीन वर्षांच्या औषधपाण्यानेही हा डोळा पूर्ववत झाला नाही. या डोळ्यातील दोषाने त्यांना खलनायकी आणि कॅरेक्टर अ‍ॅक्टरच्या भूमिकेत आणून सोडले.
7 / 8
8 / 8
आपल्या असीम जगण्याच्या, पुन:पुन्हा अडचणींवर मात करून उभ्या राहण्याच्या वृत्तीने एक दोन नव्हे सात दशकं , सत्तर वर्षे काम करणार्‍या ललिताबार्इंनी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. काळाच्या पटलावर घासूनपुसून परीक्षा देणारी ही पडद्यावरची ‘सासू’ खरीखुरी हिरॉइन होती.२४ फेब्रुवारी १९९८ मध्ये औंधमधील आपल्या निवासस्थानी ललिताबाई याचं निधन झालं.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी