Join us  

किसींग सीन्स देण्यावर दिग्दर्शकांचा भर, 'हेट स्टोरी' नंतर अभिनेत्रीने कायमचा बॉलिवूडला ठोकला राम राम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 7:05 PM

1 / 8
बंगाली सोबतच तिनं हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘हेट स्टोरी’ या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात आली होती.
2 / 8
विशेष म्हणजे या चित्रपटात तिनं केलेल्या किसिंग सीन्समुळं ती प्रचंड चर्चेत होती.
3 / 8
बॉलिवूडमध्ये नेहमीच अभिनेत्रींना दुय्यम स्थान दिले जाते. आजही अभिनेत्यांसाठी अभिनेत्री या शोभेचीच बाहुली असल्याचे तिने म्हटले आहे.
4 / 8
बॉलीवुडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं पाओलीला वाटतं.
5 / 8
बॉलिवूडमध्ये सुरुवातीपासूनच पाओली दामकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या.
6 / 8
मात्र आता तिला किसिंग सीनचाच वीट आला आहे. त्यामुळेच अशा भूमिका मला नको असंच जाहीर करुन टाकलं आहे.
7 / 8
सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं की आपण कायम असेच सीन्स दिले पाहिजेत.पण तेच ते काम करुन नवीन काही करायला मिळतच नाही.
8 / 8
पाओली 'रात बाकी है' वेब सीरिजच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे.