Join us

गुलजार-राखी रंगात रंगले ...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST

सर्वत्र होळीचा माहोल असतांना गुलजार आणि राखी हे होळीच्या विविध रंगात होली सेलिब्रेशन करत होते. सेलिब्रिटी दुनियेच्या झगमगाटापासून एकदम दूर त्यांचं वेगळंच विश्व असल्याप्रमाणे त्यांनी अत्यंत साधेपणाने आणि आनंदाने होळी साजरी केली. हे फोटो पाहा, तुम्हाला येईलच अंदाज....

सर्वत्र होळीचा माहोल असतांना गुलजार आणि राखी हे होळीच्या विविध रंगात होली सेलिब्रेशन करत होते. सेलिब्रिटी दुनियेच्या झगमगाटापासून एकदम दूर त्यांचं वेगळंच विश्व असल्याप्रमाणे त्यांनी अत्यंत साधेपणाने आणि आनंदाने होळी साजरी केली. हे फोटो पाहा, तुम्हाला येईलच अंदाज....दिग्दर्शक, कवी असलेल्या गुलजार आणि अभिनेत्री राखी गुल्जार यांची मुलगी मेघना गुल्जार हिने त्यांना रंग लावून होळी साजरी केली.गुलजार हे त्यांचे फिल्मी जगतातील ग्लॅमर विसरून अत्यंत आनंदाने होळीचे रंग खेळत होते. त्याचा हा पुरावा. या फोटोत ते फोटोग्राफर्सनाही रंग लावायला निघाले आहेत असे दिसतेय. नाही का?अजूनही गुलजार आणि राखी यांच्यातील पे्रम तेवढेच गुलाबी आहे. या फोटोत गुल्जार राखी यांच्या अंगावर पिचकारीने रंग उडवून ते व्यक्त तर करत नाहीत ना? पहा त्यांचा हा अनोखा अंदाज...वय कितीही वाढलं तरीही व्यक्तीमधील निरागसता काही संपत नसते. ज्येष्ठ अभिनेत्री राखी या एका लहान मुलावर पिचकारीने लांबूनच रंग उडवत आहेत. ‘किती वेळापासून माझ्या अंगावर रंग टाकतोस काय? थांब आता मीच तुला रंगांनी भिजवते... असं तर म्हणत नसतील ना त्या?