रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:28 IST
1 / 10अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia) सध्या आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात जिनिलीया आमिरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणार आहे. 2 / 10या सिनेमाच्या निमित्तानं जिनिलिया विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. नुकतंच एका मुलाखतीमध्ये तिनं जॉन अब्राहमसोबत लग्न झाल्याच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. 3 / 10निशिकांत कामत दिग्दर्शित 'फोर्स' या चित्रपटात अभिनेत्री जिनिलिया डिसूझा आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. २०११ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 4 / 10या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जिनिलिया आणि जॉनने चुकून लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. चित्रपटामध्ये जिनिलिया आणि जॉनच्या लग्नाचा (Genelia And John Marriage) एक सीन होता. या सीनच्या शूटिंगदरम्यान पुजाऱ्याने चुकून जॉन आणि जिनिलियाच्या लग्नाचे विधी पूर्ण केले होते, असं म्हटलं गेलं होतं.5 / 10या सीनदरम्यान खऱ्या पुजाऱ्याला बोलावण्यात आलं होतं, ज्यांनी पारंपरिक मंत्रोच्चार करत विधी पार पाडल्याचं बोललं गेलं. त्या पुजाऱ्यांचं नाव होतं पंडित भागवत गुरूजी. त्यांनी सांगितलं होतं की, सेटवर अनवधानाने खऱ्या लग्नाचे सर्व विधी जसं की वरमाळा घालणे, मंगळसूत्र बांधणे आणि सात फेऱ्या पार पडले आहेत. पंडित भागवत गुरुजींच्या मते, या विधींमुळेच दोघांचं लग्न झालं आहे. या चर्चांवर दोघांनी आजवर कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. 6 / 10अलीकडेच जिनिलियानं सिद्धार्थ कन्ननशी बोलताना त्या पसरलेल्या बातम्याचं (Genelia Denies Marrying John Abraham) सत्य सांगितले. असे कोणतेही लग्न कधीच झाले नसल्याचे तिने स्पष्ट केले.7 / 10जिनिलिया म्हणाली, 'त्यात काहीही तथ्य नव्हतं. आमचं लग्न झालं नव्हतं. या कथा पीआरने पसरवल्या होत्या आणि मला वाटतं की तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की त्यांनी हे का केलं'. जिनिलियाने स्पष्ट केलं की तो एक प्रसिद्धी स्टंट होता. त्यात तिचा किंवा जॉनचा कोणताही सहभाग नव्हता. 8 / 10या अफवांदरम्यान निर्माते विपुल शाह यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना चित्रपटात पुजाऱ्याच्या भूमिकेसाठी एखाद्या ज्युनिअर आर्टिस्टला घ्यायचं होतं. परंतु सीन खरा वाटावा यासाठी दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी खऱ्या पुजाऱ्याला त्या भूमिकेसाठी घेतलं होतं. ते म्हणाले, 'ही माझ्या दिग्दर्शनाच्या खरेपणाबद्दलच्या प्रेमाची किंमत आहे. नंतर तो पुजारी असा काही दावा करेल याची आम्हाला कल्पनाही नव्हती'. विपुल यांनी असंही सांगितलं की, जिनिलिया ही ख्रिश्चन असल्याने हिंदू विवाहपद्धती तिच्यासाठी लागू होत नाहीत. त्यांनी हे संपूर्ण प्रकरण प्रसिद्धी स्टंट असल्याचे देखील नाकारले.9 / 10या सर्व अफवांनंतर जिनिलियानं ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोबत लग्न केलं होतं. त्याआधी दोघंही ८ वर्ष एकमेकांना डेट करत होते.10 / 10 लग्नाला इतकी वर्ष होऊनही दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. हे दोघे त्यांच्या चाहत्यांना कायम कपल गोल्स देतात. या जोडीला दोन मुलं आहेत.