Join us

गजरा, बिंदी अन्...; जिनिलीयाचा असा लूक, फोटो पाहून आठवेल 'हम आपके है कौन'मधली माधुरी दीक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:28 IST

1 / 8
महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलीया देशमुखचा चाहता वर्ग मोठा आहे. जिनिलीया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
2 / 8
नुकतंच जिनिलीयाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने खास लूक केल्याचं दिसत आहे.
3 / 8
जिनिलीयाने निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. यावर तिने डिझायनर ओढणी घेतली आहे.
4 / 8
कानात मोठे खड्यांचे कानातले, खड्यांची ज्वेलरी घालत तिने केसांत गजरा माळला आहे. यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.
5 / 8
या फोटोंना जिनिलीयाने 'गजरा, बिंदी, हाथफूल, अनारकली और मै मेरी फेव्हरेट हूँ', असं कॅप्शन दिलं आहे.
6 / 8
जिनिलीयाच्या या फोटोंवरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीये. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
7 / 8
जिनिलीयाचा हा लूक पाहून 'हम आपके है कौन'मधल्या माधुरी दीक्षितची आठवण चाहत्यांना आली आहे.
8 / 8
दरम्यान, जिनिलीया 'सितारे जमीन पर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती आमिरसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
टॅग्स :जेनेलिया डिसूजामाधुरी दिक्षित