By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:38 IST
1 / 10फराह खान ही बॉलिवूडमधील एक अत्यंत प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि निर्माती आहे. सध्या ती तिच्या युट्यूब व्लॉग्समुळे चर्चेत असते. अनेक सेलिब्रिटींची घरं ती एक्सप्लोर करते. चाहत्यांनाही दाखवते. तसंच त्यांना स्पेशल रेसिपी बनवायला लावते.2 / 10फराह खान ही कायम चर्चेत तर असतेच. पण, आता तिचा पती आणि चित्रपट निर्माते शिरीष कुंदर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. 3 / 10गेल्या काही काळापासून प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर असलेले शिरीष अचानक एका नव्या अवतारात समोर आला आहे. 4 / 10इंस्टाग्रामवर शेअर केलेले त्यांचे लेटेस्ट फोटो पाहून नेटकऱ्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. ज्यामध्ये तो प्रचंड फिट आणि तरुण दिसत आहेत. 5 / 10तर कधी तो शर्टलेस होऊन आपली बॉडी फ्लॉन्ट करत आहे, तर कधी स्टायलिश सूटमध्ये एखाद्या टॉप मॉडेलला टक्कर देताना दिसत आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी त्यांची तुलना अभिनेता कार्तिक आर्यनशी केली आहे. शिरीषचा हा लूक पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. 6 / 10काही नेटकऱ्यांच्या मते हे फोटो AI (Artificial Intelligence) किंवा फोटोशॉपच्या मदतीने एडिट केलेले आहेत. 'हा खरा शिरीष असूच शकत नाही' अशा कमेंट्स अनेकजण करत आहेत.तर दुसरीकडे, काही चाहत्यांनी त्यांच्या या मेहनतीचे कौतुक केले असून, 'वयाला मागे टाकणारा लूक' अशा शब्दांत त्याचे कौतुक केले आहे.7 / 10शिरीष कुंदरनं 'मैं हूं ना', 'ओम शांती ओम' आणि 'जोकर' यांसारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे. नेहमी पडद्यामागे राहणारा शिरीष आता आपल्या 'लुक'मुळे चर्चेत आला आहे. त्याचे ट्रान्सफॉर्मेशन नैसर्गिक आहे की एआय, हे लवकरच स्पष्ट होईल.8 / 10फराह खान आणि शिरीष कुंदर यांनी २००४ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. या जोडप्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. 9 / 10फराह खान आणि शिरीष या दोघांची भेट 'मैं हूं ना' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. फराह तिथे दिग्दर्शक होती आणि शिरीष एडिटिंगचे काम सांभाळत होता. 10 / 10काम करताना त्यांच्यातली जवळीक वाढली आणि मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. शिरिष आणि तिच्या वयामध्ये साधारण ८ वर्षाचं अंतर आहे. पण, एवढा मोठा वयाच्या फरक असूनही, त्यांचे नाते नेहमीच मजबूत राहिले आहे.