'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तब्बल २८ वर्षांनंतर करतेय इंडस्ट्रीत कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 07:00 IST
1 / 12अशी ही बनवा बनवी चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला. त्यावेळी या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आज या चित्रपटाला ३० वर्षांहून जास्त काळ उलटला असला तरी आजही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 2 / 12या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आणखीन एका व्यक्तीने रसिकांच्या मनावर छाप उमटविली होती. हा अभिनेता म्हणजे शंतनू माने. अशोक सराफ यांच्या म्हणजेच धनंजय मानेच्या भावाची भूमिका साकारली होती सिद्धार्थ रेने.3 / 12सिद्धार्थने १९७७ मध्ये आलेल्या ‘चानी’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. १९८० मध्ये आलेल्या ‘थोडीशी बेवफाई’ ह्या चित्रपटातून अभिनेता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. त्यानंतर त्याने बऱ्याच सिनेमात काम केले. 4 / 12फार कमी लोकांना माहित आहे की, सिद्धार्थ रेची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.5 / 12१९९९ मध्ये लोकप्रिय अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत विवाह केला होता. शांतिप्रिया हिने अनेक तामिळ आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. अक्षय कुमारचा सौगंध या पहिल्याच चित्रपटात शांतीप्रिया अभिनेत्री होती. ती साऊथची लोकप्रिय अभिनेत्री भानुप्रिया हिची छोटी बहीण आहे.6 / 12लग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली असतील अचानक ८ मार्च २००४ रोजी वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना दोन मुले देखील आहेत. मुलाचे नाव शुभम आणि मुलीचे नाव शिष्या आहे. 7 / 12सिद्धार्थच्या निधनानंतर शांतिप्रियाने चित्रपटात काम करणे खूप कमी केले होते. परंतु आता काही काळ गेल्यानंतर तिने आपल्या अभिनयाच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली आहे. आता ती हिंदी मालिकांमध्ये काम करते.8 / 12'भारत कोकिला' या सरोजिनी नायडू यांच्या जीवनावर बायोपिक चित्रपट बनणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. 9 / 12जेव्हा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी त्याच्या स्टारकास्टबद्दल कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता.10 / 12 पण आता या चित्रपटात सोनल मोंटेरो तरुण सरोजिनीची भूमिका साकारणार असून नंतर अभिनेत्री शांती प्रिया या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.11 / 12शांती प्रियाची पन्नाशी उलटली असली तरी आजही ती खूप ग्लॅमरस दिसते. 12 / 12शांती प्रिया बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येते.