Join us  

माधुरी दीक्षितसारखी दिसते म्हणून सोडावी लागली या अभिनेत्रीला इंडस्ट्री, जाणून घ्या सध्या काय करते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 7:00 PM

1 / 9
'मिस्टर आजाद' या सिनेमातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात करणाऱ्या निक्कीला बॉलीवुडला रामराम का करावा लागला याचा खुलासा खुद्द तिनेच केला होता.
2 / 9
1992च्या दरम्यान कॉलेजमध्ये असताना निक्कीने मॉडेलिंगमध्ये हात आजमावले. यावेळी तिने अनेकांची मनं जिंकली त्यामुळेच की काय दुसऱ्या क्रमांकाचा अवॉर्ड मिळाला होता.
3 / 9
मात्र निक्कीचं पायलट बनण्याचं स्वप्न होतं. तिनं त्यासाठी 72 तासांची एक टेस्टही दिली होती. मात्र वडिलांनी यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने निक्कीने पायलट बनण्याचं स्वप्न अर्धवट सोडून दिलं.
4 / 9
यानंतर भावानं केलेल्या मार्गदर्शनामुळे तिने आपला पहिला पोर्टफोलिओ बनवला. यानंतर निक्कीचं नशीब जणू काही पालटलं. तिचा पोर्टफोलिओ पाहून तिला जाहिरातीच्या विविध ऑफर्स येऊ लागल्या.
5 / 9
तिची पहिली कमाई 8 हजार रुपये होती. जाहिरात, मॉडेलिंगबद्दल निक्कीच्या मनात विशेष आवड निर्माण झाली. मात्र यांत करियर करण्याच्या इच्छेला तिलांजली देत निक्की पुन्हा वडिलांकडे आली.
6 / 9
वडिलांकडे आग्रह करुन तिने सिनेमात काम करण्याची परवानगी मिळवली. 'मिस्टर आजाद' या पहिल्याच सिनेमातील तिच्या कामाचं कौतुकही झालं. मात्र त्याचेवळी ती माधुरीची डुप्लिकेट असल्याचा शिक्काही तिच्यावर बसला.
7 / 9
पहिल्या सिनेमानंतर निक्कीकडे ब-याच ऑफर्स आल्या होत्या. मात्र जीवनात घडलेल्या एका घटनेमुळे ती चांगलीच हादरली. तिच्या वडिलांचं अचानक निधन झालं आणि तिनं सिनेमात काम करण्यास नकार दिला.
8 / 9
सिनेमांसाठी घेतलेले पैसे तिने परत केले. वडिलांच्या अकाली निधनामुळे निक्की अशी काही कोसळली की तिनं या इंडस्ट्रीलाच रामराम ठोकला.
9 / 9
निकीने लंडनमध्ये राहणारा सनी वालियासह 2002 मध्ये लग्न करत तिथेच स्थायिक झाली. लग्नानंतर निकी लंडनमध्ये राहत असली तरी टीव्ही मालिका, वेबसिरीजमधून रसिकांच्या भेटीला येत असते.
टॅग्स :माधुरी दिक्षित