'या' स्टार अभिनेत्रीच्या डोक्यात उवा झाल्या, कोटींची मालकीण तरीही सहा दिवस झोपडपट्टीत राहिली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:21 IST
1 / 11चित्रपटसृष्टीत चमक-धमक, आलिशान सेट्स आणि ग्लॅमर याबद्दल बरेच बोललं जातं. मात्र प्रत्येकवेळी शूटिंगचा अनुभव इतका सुखकर असेलच असं नाही. कधीकधी तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा कलाकारांना त्यांच्या भूमिकेसाठी अनेक आव्हाने पेलावी लागतात. 2 / 11असाच एक अनुभव लोकप्रिय अभिनेत्रीला आलाय. कोटींची मालकीण असलेल्या या अभिनेत्रीला शूटिंग दरम्यान तिला ६ दिवस झोपडपट्टीत राहावे लागले.3 / 11 तिथे स्वच्छतेच्या समस्येमुळे तिला इतका त्रास झाला की तिच्या डोक्यात उवा झाल्या. शूटिंगनंतर तिला त्यावर उपचार घ्यावे लागले.4 / 11ती अभिनेत्री आहे दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar). सुंदरता आणि कमाईच्या बाबतीत ती भल्याभल्यांना टक्कर देते. 5 / 11दिव्या लवकरच 'एक चतुर नार' (Ek Chatur Naar) या कॉमेडी-थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये दिव्यासोबत अभिनेता नील नितीन मुकेश मुख्य भुमिकेत आहे. 6 / 11एनडीटीव्हीला दिलेली खास मुलाखतीमध्ये दिव्याने या चित्रपटासाठी केलेल्या तिच्या मेहनतीबद्दल आणि शुटिंगदरम्यान कोणत्या प्रकारच्या संघर्षांना तोंड द्यावे लागले याबद्दल मोकळेपणाने सांगितले. 7 / 11 'एक चतुर नार' या चित्रपटात दिव्याने एका अतिशय साध्या मुलीची भूमिका साकारली आहे. 8 / 11 चित्रपटासाठी शुटिंग करताना पात्राला १०० टक्के न्याय देण्यासाठी दिव्याने अनेक अडचणींचा सामाना केला. दिव्याने सांगितले की, शूटिंग दरम्यान तिला ६ दिवस झोपडपट्टीत राहावे लागले. झोपडी जवळजवळ नाल्याच्या काठावर होती.9 / 11दिव्या म्हणाली, 'या काळात स्वच्छतेचाही प्रश्न होता. त्यामुळे डोक्यात उवा आल्या. शूटिंगनंतर ते बरे करण्यासाठी उपचार घ्यावे लागले'. आता दिव्यानं घेतलेल्या मेहनतीला काय फळं मिळतं, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच. 10 / 11दिव्या ही चित्रपट निर्माते आणि टी-सीरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांची पत्नी आहे. या दाम्पत्याला एक एक मुलगाही आहे, ज्याचे नाव रुहान असं आहे. 11 / 11अब्जाधीश असलेली दिव्या सामान्य आयुष्य जगणेच ती जास्त पसंत करते. दिव्या सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे ६.८ मिलियन फॉलोवर्स आहेत.