Join us  

IN PICS : काजोलने नाकारले हे सुपरडुपर हिट सिनेमे, आज तिलाही होत असावा पश्चाताप!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 6:09 PM

1 / 7
भविष्यात काय होईल, कुणीही सांगू शकत नाही. कदाचित याचमुळे बॉलिवूडचे अनेक अ‍ॅक्टर्स चित्रपट नाकारतात आणि पुढे हेच सिनेमे सुपरडुपर हिट होतात. काजोलही याच अनुभवातून गेलीये. बाजीगार, दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे, कभी खुशी कभी गम, फना, माय नेम इज खान असे सुपरहिट सिनेमे काजोलने दिलेत. सोबत अनेक सुपरहिट सिनेमे नाकारलेही.
2 / 7
दिल तो पागल है हा सर्वांना वेड लावणारा सिनेमा. या सिनेमात यश चोप्रा यांना काजोल हवी होती. पण काजोलने नकार दिला आणि तिच्या जागी करिश्मा कपूरला घेण्यात आले. माधुरी दीक्षितच्या अपोझिट सेकंड लीड करायला काजोल तयार नव्हती. याच एका कारणामुळे तिने हा सिनेमा नाकारल्याचे म्हणतात.
3 / 7
मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला ‘दिल से’ हा सिनेमाही काजोलला मिळाला होता. पण डेट्स नसल्यामुळे तिने हा सिनेमा नाकारला. तिने नाकारल्यानंतर हा सिनेमा मनीषा कोईरालाकडे गेला. पुढे या सिनेमाने इतिहास रचला.
4 / 7
सनी देओल स्टारर ‘गदर’ हा सिनेमा कोण विसरू शकतो? या सिनेमासाठीही काजोल हीच पहिली पसंत होती. या सिनेमातील रोलमध्ये आपण फिट बसणार नाही, असे वाटल्याने काजोलने हा सिनेमा नाकारला आणि अमीषा पटेलला मिळाला.
5 / 7
वीरजारा या सिनेमातही यश चोप्रांना शाहरूख व काजोलची जोडी दाखवायची होती. पण काजोलने का कुणास ठाऊक हा सिनेमाही नाकारला. तिच्यानंतर या सिनेमात प्रिती झिंटाची वर्णी लागली.
6 / 7
कभी अलविदा ना कहना या सिनेमातील नैनाच्या रोलसाठी करण जोहरला काजोल हवी होती. पण काजोलने डेट्समुळे हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि ही भूमिका राणी मुखर्जीच्या वाट्याला गेली.
7 / 7
3 इडियट्स या सिनेमासाठीही सर्वात आधी काजोलला विचारणा झाली होती. पण ती तिच्या भूमिकेबद्दल समाधानी नव्हती. अशात ही भूमिका करिना कपूरच्या झोळीत पडली.
टॅग्स :काजोल