रेखा यांच्या ६ बहिणींना पाहिलंत का? दिसायला आहेत खूपच सुंदर, या क्षेत्रात आहेत कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 12:59 IST
1 / 12रेखा हे बॉलिवूडचे असे नाव आहे ज्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. 2 / 12सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. रेखा यांनी आजवर १८० पेक्षा जास्त सिनेमात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे. 3 / 12रेखा यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. कायम आपलं खासगीपण जपणाऱ्या रेखा यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना आवडतं. 4 / 12साऊथमधून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या रेखा यांनी त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने जे स्वप्न पाहिले होते ते सर्व साध्य केले. खरे प्रेम सापडत नाही. ते प्रेम त्यांना ना वडिलांकडून मिळाले ना इतर कोणाकडून. रेखा यांचे कुटुंब मोठे असून, ६ बहिणी आणि १ भाऊ आहे. 5 / 12रेखा सध्या एकटीच मुंबईत राहत असली तरी तिचं कुटुंब हे मोठं आहे. तिला सहा बहिणी असून त्या सर्व आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. रेखा यांनी अतिशय कमी वयात चित्रपटांमध्ये कामाला सुरुवात केलीय आणि त्यांच्या बहिणींनाही त्यांनी मदत केली आहे.6 / 12रेखा यांचे वडिल जेमिनी गणेशन हे तामिळ चित्रपटसृष्टीतले एक दिग्गज होते. त्यांची तीन लग्न झाली. त्यांना पहिल्या पत्नीपासून चार, दुसऱ्या पत्नीपासून रेखा आणि राधा या दोन मुली, तिसऱ्या पत्नीपासून विजया चामुंडेश्वरी आणि मुलगा सतीश.7 / 12 रेखा यांचं आणि त्यांच्या वडिलांचं फारसं पटलं नाही. मात्र त्यांच्या सर्व भावंडांसोबत त्यांचं चांगलंच मेतकूट जमतं. त्यांच्या सहा बहिणींची नावं अशी आहेत जया श्रीधर, नारायणी गणेशन, विजया चामुंडेश्वरी, रेवती स्वामीनाथन, राधा उस्मान सैयद आणि कमला सेल्वराज.8 / 12रेवती स्वामीनाथन ही रेखा यांची सर्वात मोठी बहिण आहे. ती अमेरिकेत डॉक्टर आहे. 9 / 12रेखा यांची दुसरी बहिण कमला सेल्वराज भारतातली विख्यात डॉक्टर आहे. त्यांचं चेन्नईत हॉस्पिटल आहे. 10 / 12रेखा यांची तिसऱ्या क्रमांकाची बहिण आहे नारायणी गणेश ती आघाडीच्या वृत्तपत्रात स्तंभलेखिका आहे.11 / 12खाची सख्खी बहिण राधाही एक अभिनेत्री असून तिने लग्नानंतर चित्रपटात काम करणं बंद केलं.12 / 12या सगळ्याच बहिणी आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध असून रेखा यांना कायम आपल्या बहिणींचं कौतुक असतं.