Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन रामपालने गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा, लग्नाआधीच कपलला आहेत २ मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:00 IST

1 / 10
बॉलिवूडमधील हँडसम हंक आणि ज्येष्ठ अभिनेता अर्जुन रामपाल सध्या आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहेत.
2 / 10
एकिकडे 'धुरंधर' या चित्रपटातील अर्जुन रामपालचं अभिनयाचे कौतुक होत आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याने आपल्या खासगी आयुष्यातील एक मोठा आणि महत्त्वाचा खुलासा केला आहे.
3 / 10
गेली सहा वर्षे 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये असलेल्या अर्जुन रामपालने अखेर त्याची प्रेयसी गॅब्रिएला डेमिट्रिएड्सशी साखरपूडा केल्याची पुष्टी केली आहे.
4 / 10
अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमिट्रिएड्स यांनी अलीकडेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या दरम्यान अर्जुन रामपालने साखरपूडा केल्याचा मोठा खुलासा केला, ज्यामुळे त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले.
5 / 10
जेव्हा गॅब्रिएलाला लग्नाबद्दल विचारले गेले, तेव्हा ती म्हणाली, 'आम्ही अजून लग्न केलेले नाही, पण लवकरच लग्न करू शकतो'. त्यानंतर अर्जुन रामपालने लगेच म्हटलं, 'आम्ही साखरपूडा केला आहे हे आता आम्ही तुमच्या शोमध्ये हे उघड करत आहोत'.
6 / 10
अर्जून आणि ग्रॅब्रिएला हे गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत. ग्रॅबिएला ही अर्जूनपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे.
7 / 10
अर्जून आणि ग्रॅब्रिएला यांना लग्नाआधीच दोन मुलं आहेत. गॅब्रिएलाने जुलै २०१९ मध्ये मुलगा एरिकला जन्म दिला. त्यानंतर ४ वर्षांनी, २०२३ मध्ये गॅब्रिएलाने दुसऱ्या मुलगा एरिवला जन्म दिला आहे. आता ६ वर्षांच्या नातेसंबंधानंतर हे जोडपे लवकरच लग्न करू शकते.
8 / 10
अर्जुनचं पहिलं लग्न मॉडेल मेहर जेसियासोबत झाले होते. मग लग्नाच्या २० वर्षांनंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. अर्जुन आणि मेहरने १९९८मध्ये लग्न केले होते. मेहर आणि अर्जुनला दोन मुली आहेत.
9 / 10
मोठी मुलगी माहिका हिचा जन्म २००२ मध्ये झाला. तर धाकटी मुलगी मायराचा जन्म २००५ मध्ये झाला. मेहरपासून वेगळं झाल्यानंतर अर्जूननं वडील म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तो आपल्या मुलींसोबत वेळ व्यतित करताना दिसतो. पहिल्या लग्नापासून दोन मुली आणि गर्लफ्रेंड गॅब्रिएलापासून दोन मुलं अशाप्रकारे अर्जून हा चार मुलांचा पिता आहे.
10 / 10
अर्जुन त्याचे लग्न तुटले त्यासाठी स्वतःला जबाबदार मानतो. तो सांगतो की, मेहरसोबत घटस्फोट घेणं खूप कठीण होतं कारण त्या सर्वांचा परिणाम मुलांवर होतो.
टॅग्स :अर्जुन रामपाल