Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरचा जावई आहे 'हा' धुरंधर फेम अभिनेता! हवाई सुंदरीच्या प्रेमात पडली त्याची विकेट, ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:05 IST

1 / 7
हिंदी सिनेसृष्टीत सध्या धुरंधर सिनेमाची चर्चा सुरू आहे. 'धुरंधर'च्या अफाट यशाचं श्रेय जितकं कथा, कलाकार, दिग्दर्शक, बॅकग्राऊंड म्युझिक यांनाच द्याव लागेल.
2 / 7
रणवीर सिंग, सारा अर्जुन आणि संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन या सगळ्यांनीच आपली भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.या चित्रपटात आर.माधवनने साकारलेली भूमिका सुद्धा लक्ष वेधून घेत आहे.
3 / 7
आर. माधवनने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९९७ मध्ये केली. मात्र, माधवन ‘अलाईपायूथे’ या सिनेमामुळे स्टार झाला आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला.
4 / 7
अभिनेता आर माधवन तमिळ असला तरी त्याचे महाराष्ट्राशी एक खास नातं आहे. आर माधवन हा कोल्हापुरचा जावई आहे.
5 / 7
अभिनेता बनून लाखो तरूणीच्या हृदयावर राज्य करण्यापूर्वी आर.माधवन हा पब्लिर स्पीकिंग कोच होता.त्याचदरम्यान त्याची भेट कोल्हापुरच्या सरिता बिर्जेसोबत झाली आणि दोघांचे सूर जुळले. त्यावेळी सरिता एअर होस्टेसची ट्रेनिंग घेत होती.
6 / 7
आर माधवनने कोल्हापुरच्या सरिता बिर्जे सोबत लग्न केलं आहे. १९९९ मध्ये दोघांनी लग्न केलं असून गेली २५ वर्ष ते सुखाने संसार करत आहेत.
7 / 7
माधवनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, नुकतंच त्याचा 'आप जैसा कोई' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या सिनेमात माधवनसोबत फातिमा सना शेखने काम केलंय. याशिवाय काही महिन्यांपूर्वी माधवनचा अक्षय कुमारसोबत 'केसरी २' हा सिनेमा रिलीज झाला होता. आता तो धुरंधरमुळे चांगलाच चर्चेत आहे.
टॅग्स :आर.माधवनरणवीर सिंगधुरंधर सिनेमा