Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhurandhar 2: २५७ कोटींचं 'धुरंधर २'चं बजेट! रणवीर सिंगने किती पैसे घेतले? कलाकारांच्या मानधनाचा आकडा समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:04 IST

1 / 11
Dhurandhar 2: आदित्य धरचं दिग्दर्शन असलेला 'धुरंधर २' १९ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. रिलीज होण्याआधीच 'धुरंधर २'ची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे.
2 / 11
'धुरंधर २'चं एकूण बजेट २५७ कोटी इतकं आहे. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच कोटींचा गल्ला जमवला आहे.
3 / 11
'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, आर माधवन हे कलाकार दिसणार आहेत. कलाकारांच्या मानधनाचा आकडाही समोर आला आहे.
4 / 11
'धुरंधर २'साठी सगळ्यात जास्त मानधन हे रणवीर सिंगने घेतलं आहे. रणवीरने सिनेमात पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे.
5 / 11
ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने तब्बल ५० कोटी घेतल्याची चर्चा आहे.
6 / 11
संजय दत्तने 'धुरंधर २'मध्ये पाकिस्तानातील एसपी असलम चौधरीची भूमिका साकारली आहे. यासाठी त्याने १० कोटी घेतले आहेत.
7 / 11
रणवीरची हिरोईन दाखवलेली सारा अर्जुन यलीना जमालीच्या भूमिकेत आहे. या रोलसाठी तिने १ कोटी घेतले आहेत.
8 / 11
अर्जुन रामपालने 'धुरंधर २'मध्ये व्हिलनची भूमिका साकारली आहे. यासाठी त्याला १ कोटी इतकं मानधन मिळालं आहे.
9 / 11
तर आर माधवनने अजय संन्याल ही भूमिका साकारण्यासाठी ९ कोटी रुपये घेतले आहेत.
10 / 11
'धुरंधर २'मध्ये काही फ्लॅशबॅक सीन्समध्ये अक्षय खन्ना रहमान डकैत म्हणून कैमिओ करणार असल्याच्या चर्चा आहेत.
11 / 11
'धुरंधर २'मधील कैमिओसाठी अक्षयने २ कोटी इतकं मानधन घेतलं आहे.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगसंजय दत्तआर.माधवन