Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर २'मध्ये दाऊद इब्राहिम साकारलेल्या अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "मला शेवटपर्यंत माहीत नव्हतं की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:39 IST

1 / 10
Dhurandhar 2: 'धुरंधर'यच्या पहिल्या भागात बडे साहबचा उल्लेख झाला होता. दहशतवादी कारवायांचा मास्टरमाइंड असलेला बडे साहब नक्की कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
2 / 10
अखेर 'धुरंधर २'मध्ये याचा उलगडा झाल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला असून बडे साहब दुसरा तिसरा कोणी नसून दाऊद इब्राहिम आहे.
3 / 10
'धुरंधर २'मध्ये गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या दाऊदची भूमिका दानिश इकबालने साकारली आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत शूटिंगला सुरुवात होईपर्यंत दानिशला हे माहितच नव्हतं की त्याला बडे साहबची भूमिका साकारायची आहे.
4 / 10
दाऊद इब्राहिमची भूमिका साकारलेल्या दानिश इकबालने 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, 'बडे साहबची भूमिका साकारायची आहे याबद्दल कधी बोललंच गेलं नव्हतं'.
5 / 10
'शूटिंग सुरू व्हायच्या दोन महिने आधीपर्यंत मला माहीत नव्हतं की मला बडे साहब ही भूमिका साकारायची आहे. पण, मला अंदाज आला होता'.
6 / 10
'आदित्य अनेक गोष्टी लपवून ठेवतो. मला दाऊद इब्राहिमची भूमिका साकारायची आहे, हे मला माहीत होतं. पण दाऊदच बडे साहब आहे, हे माहित नव्हतं'.
7 / 10
'सगळे मला दाऊद भाई किंवा साहेब अशी हाक मारत होते. पण माझ्या भूमिकेबद्दल मला कोणीच काही सांगितलेलं नव्हतं'.
8 / 10
'मी अनेक कलाकारांना पडद्यावर अशा भूमिका उत्कृष्टपणे साकारताना पाहिलं आहे. मी थिएटरमध्ये खूप काम केलं आहे. मात्र सिनेमात मी पहिल्यांदाच अशी भूमिका साकारली आहे'.
9 / 10
दरम्यान, 'धुरंधर : द रिव्हेंज' सिनेमात रणवीर सिंग, आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
10 / 10
या सिनेमाने पहिल्याच दिवशी १४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉलिवूडमधला आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा ओपनर ठरला आहे.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंग