Join us  

कोण आहे 'ही' प्रसिद्ध डान्सर; अभिनेत्रींपेक्षाही दिसते सुंदर, पाहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 5:38 PM

1 / 5
शक्ती मोहन ही आघाडीची नृत्यांगना आहे. शक्ती लहानपणीपासूनच नृत्यात पारंगत आहे. तिला आणखी तीन बहिणी आहेत. त्यापैकी एक नीती मोहन ही गायिका आहे.
2 / 5
शक्ती मोहन ही रिएलिटी शो डान्स इंडिया डान्स सीझन २ ची विजेता आहे. तर सध्या ती डान्स प्लस ची जज आहे.
3 / 5
शक्तीने इन्स्टाग्रामवर समुद्रकिनारी साडीतील फोटो अपलोड केले आहेत. ते पाहून फॅन्स सुंदर असे कमेंडही करत आहेत.
4 / 5
शक्ती रणबीर कपूरच्या शमशेरा मध्ये नृत्यदिग्दर्शिका होती. तर ऑंख लड जावे नृत्य जॅम, कान्हा रे, आखिरी बार, द छमिया सॉंग, सातो जनम आणि कमली या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.
5 / 5
शक्तीने नृत्यशक्ती हे ब्रॅंड सुरु केले आहे, तसेच ब्रेक अ लेग या युट्युब वेब सीरीज मध्येही तिने काम केले आहे. शक्तीचे सौंदर्य अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. तिची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे.
टॅग्स :शक्ती मोहननृत्यडान्स प्लस 4इन्स्टाग्राम