Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळी तिची भलतीच क्रेझ, राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला; वेश्याव्यवसायात अडकली अन् पुरती फसली सौंदर्यवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:49 IST

1 / 7
हिंदी चित्रपटसृष्टीत शून्यातून सुरुवात करुन प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलेली अनेक व्यक्तिमत्व आहेत. मात्र, त्यातील काहींनाच हे यश टिकवता आलं.कालांतराने ते इंडस्ट्रीतून गायब झाले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे श्वेता बसू.
2 / 7
श्वेता बसूने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच एकामागून एक अनेक हिट चित्रपट दिले.तिच्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. श्वेताने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली.
3 / 7
वयाच्या ११ व्या वर्षीच तिने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. २००२ मध्ये आलेल्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित मकडी या सिनेमाने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली.
4 / 7
शिवाय 'कहाणी घर घर की','करिश्मा का करिश्मा' या गाजलेल्या मालिकांमध्ये ती दिसली. २००५ साली आलेल्या श्रेयस तळपदेच्या 'इकबाल'मध्येही ती होती.
5 / 7
सगळं काही सुरुळीत सुरु असतानाच अभिनेत्रीच्या आयुष्यात एक वादळ आलं आणि ती इंडस्ट्रीपासून दुरावली.
6 / 7
2014 साली अभिनेत्री श्वेता बसू वेश्या व्यवसाय करताना पकडली गेली अशी बातमी आली होती. तिने नंतर तसं मान्यही केल्याचं कळलं होतं. पैशांच्या अडचणींमुळे ती त्या व्यवसायाकडे वळाली.
7 / 7
याचा तिच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. श्वेता बसूने या संकटांवर मात करत जिद्दीने इंडस्ट्रीत कमबॅक केलं.श्वेता नुकतीच त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर सीरिजमध्ये दिसली. यामधील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. याशिवाय दोन वर्षांपूर्वी ती 'क्रिमिनल जस्टिस', 'महाराणी'या गाजलेल्या वेबसीरिजमध्येही झळकली.
टॅग्स :श्वेता बासू प्रसादबॉलिवूडसेलिब्रिटी