Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्यासोबत तुलनेवर पहिल्यांदाच बोलली स्नेहा उल्लाल, जाणून घ्या कुणाला दिला याचा दोष...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 13:27 IST

1 / 13
२००५ मध्ये जेव्हा स्नेहा उल्लालने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली तेव्हा ती बरीच चर्चेत होती. एकतर तिचा पहिला सिनेमा सलमान खानसोबत होता आणि दुसरी बाब म्हणजे तिचा चेहरा ऐश्वर्या राय बच्चनसोबत फार मिळता जुळता होता. आता तब्बल १५ वर्षांनंर स्नेहा ऐश्वर्यासोबत तुलना केल्या गेल्यावरून मोकळेपणाने मत व्यक्त केलंय. ती बऱ्याच वर्षांनी 'एक्सपायरी डेट'मधून डिजिटल डेब्यू करत आहे.
2 / 13
स्नेहाने सांगितले की, 'आपला रंग आणि चेहऱ्याच्या बनावटीसोबत मी फार सहज आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या तुलनेने मला परेशान केलं नाही'.
3 / 13
ती पुढे म्हणाली की, 'ही पीआरची रणनीति होती की, मला कशाप्रकारे प्रेझेन्ट केलं जावं. त्यांनी पूर्णपणे तुलनेवर जोर दिला. नाही तर ही फार मोठी बाब झाली नसती'.
4 / 13
स्नेहाला वाटतं की, युवावस्थेत तिने स्वत:ला आणखी प्रशिक्षित करण्याला वेळ द्यायला हवा होता.
5 / 13
ती म्हणाली की 'मला माझ्या जीवनाचा पश्चाताप नाही. पण मला वाटतं की, मी माझ्या करिअरची सुरूवात फार लवकर केली होती'.
6 / 13
स्नेहा म्हणाली, 'जर मी थोडी वाट पाहिली असती तर मी स्वत:ला आणखी चांगलं प्रशिक्षित करू शकले असते किंवा या गोष्टींचं महत्व चांगल्या प्रकारे समजू शकले असते'.
7 / 13
स्नेहा आता १५ वर्षांनी झी ५ चा थ्रिलर शो 'एक्सपायरी डेट' मधून डिजिटल डेब्यू करत आहे. ही दोन जोडप्यांची कथा आहे. ज्यात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत दाखवण्यात आलं आहे.
8 / 13
स्नेहा म्हणाली की, 'मी शूटींग सुरू करण्याआधी थोडी घाबरलेले होते. कारण मी बऱ्याच वर्षांनी अभिनय करणार होती. हे माध्यमही माझ्यासाठी नवीन आहे. पण मी जेव्हा सेटवर पोहोचली तेव्हा सगळे विचार गायब झाले. आता मला माझं बेस्ट काम द्यायचं आहे'.
9 / 13
10 / 13
11 / 13
12 / 13
13 / 13
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीऐश्वर्या राय बच्चन