celebs at lakme fashion week
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 11:45 IST
मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी रॅमवर आपला जलवा दाखवला. सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन, अर्जुन कपूर आणि तमन्ना भाटिया यांनी रॅमवॉक केला. यासगळ्यांमध्ये उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ते दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या हटके स्टाइलने.
celebs at lakme fashion week
मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी रॅमवर आपला जलवा दाखवला. सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन, अर्जुन कपूर आणि तमन्ना भाटिया यांनी रॅमवॉक केला. यासगळ्यांमध्ये उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ते दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या हटके स्टाइलने. सोनाक्षी सिन्हाने टॉपवर एक स्टायलिश जॅकेट परिधान केले होते. याचबरोबर तिने एक बॅगसुद्धा घेतली होती जी तिच्या लूकला सूट करत होती. सोनाक्षीने या फॅशन वीकदरम्यान वेगवेगळे कॅश्च्युम परिधाने केलेले होते. प्रत्येक कॅश्च्युम सोनाक्षीने कॉन्फिडंटली कॅरी केला. सोनाक्षी सिन्हा भलत्याच कूल मूडमध्ये रॅमवर अवतरली. बाहुबली गर्ल तमन्ना भाटिया ही ब्लॅक वनपीसमध्ये रॅमवॉक करताना दिसली. बद्रीनाथ की दुल्हनियामधला ब्रदीनाथ अर्थात वरुण धवने ही ट्रेटिंशन अंदाजात रॅमवर आला. अर्जुन कपूरने घातलेल्या ब्लॅक कुर्त्यात तो हँडसम दिसत होता. वरुण आणि अर्जुन यावेळी रॅमवर मस्तीच्या अंदाजात दिसले. दोघांनीही मिळून रॅमवर धमाल मस्ती केली. अभिनेता प्रतिक बब्बर आपल्या खास स्टाइलमध्ये रॅमवर दिसला.