Join us  

बोमन इराणीचा थोरला लेक आहे प्रसिद्ध दिग्दर्शक; 'स्टुडंट ऑफ द इअर'साठी केलंय काम

By ओमकार संकपाळ | Published: July 08, 2022 12:36 PM

1 / 8
बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या यादीत अभिनेता बोमन इराणी यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
2 / 8
'मुन्ना भाई एम बी बी एस', '3 इडियट्स', 'लगे रहो मुन्ना भाई', 'डॉन 2', 'रनवे' अशा कितीतरी चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.
3 / 8
त्यांची '3 इडियट्स'मधील वायरस ही भूमिका विशेष गाजली. या चित्रपटामुळे रातोरात त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली.
4 / 8
बोमन इराणी यांच्याप्रमाणेच त्यांचा थोरला लेकही कलाविश्वात सक्रीय असून तो प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.
5 / 8
बोमन इराणी यांना दोन मुलं आहेत. त्यातील थोरला लेकल कायोज इराणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.
6 / 8
कायोज बऱ्यापैकी आपल्या वडिलांप्रमाणे म्हणजे बोमन इराणी यांच्याप्रमाणे दिसतो.
7 / 8
कायोजने 'स्टूडेंट ऑफ द इअर', 'अजीब दास्तान', 'द लीजेंड ऑफ माइकल मिश्रा', 'यंगिस्तान' यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे.
8 / 8
कायोज सोशल मीडियावर सक्रीय असून त्याने बोमन यांच्यासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. यात काही सेटवरील आहेत. तर, काही घरातील कार्यक्रमांमधील.
टॅग्स :बोमन इराणीबॉलिवूडसेलिब्रिटी