By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:47 IST
1 / 7बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगणसाठी २ एप्रिल हा दिवस खूप खास आहे. कारण आज अभिनेत्याचा वाढदिवस आहे.2 / 7अजय देवगण आज ५६वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्यानिमित्ताने त्याच्या चाहत्यांची त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.3 / 7मात्र त्याला त्याच्या लेडी लव्हकडून खास शुभेच्छा मिळाल्या आहेत. काजोलने त्यांचा रोमँटिक फोटो शेअर करत अजय देवगणला शुभेच्छा दिल्या आहेत.4 / 7काजोलने फोटो शेअर करत लिहिले की, सर्व कूल लोकांचा जन्म ऑगस्टमध्ये झाला होता. तरीदेखील तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. नेहमीच वयाने माझ्यापेक्षा मोठे राहण्यासाठी आभारी आहे. 5 / 7काजोलचा वाढदिवस ऑगस्टमध्ये असतो. ती अजयपेक्षा वयाने ६ वर्ष लहान आहे.6 / 7काजोलच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. चाहते या पोस्टवर अजय देवगणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.7 / 7वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अजय देवगण शेवटचा आझाद सिनेमात दिसला होता. लवकरच तो रेड २ आणि सन ऑफ सरदारमध्ये दिसणार आहे.