९० च्या दशकातील चॉकलेट हिरो! किंग खानवर पडलेला भारी; 'ती' एक घटना अन् करिअर संपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:23 IST
1 / 8 बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत टिकून राहणं प्रत्येकाला शक्य नसतं. असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या पदार्पणाच्या चित्रपटातच मोठी हवा निर्माण केली होती, पण काही वर्षांनी प्रेक्षकांना त्यांचा विसर पडला.2 / 8 ९० च्या दशकात सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या नायकांची चलती असताना एक डॅशिंग हिरोची एन्ट्री झाली. आपल्या अभियाने या नायकाने भल्याभल्यांना टक्कर दिली. मात्र, एका चुकीमुळे त्यांचं करिअर संपलं. 3 / 8 या अभिनेत्याचं नाव पृथ्वी वाजिर. दिव्या भारतीसोबत दिल का क्या कसूर या चित्रपटातून त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या चित्रपटाने अभिनेत्याला रातोरात स्टार बनवलं.4 / 8 यानंतर पृथ्वीसाठी अनेक निर्मात्यांच्या कार्यालयाचे द्वार खुले झाले. एकेकाळी या अभिनेत्याला चित्रपटात कास्ट करण्यासाठी निर्माते वेटिंग लिस्टवर असायचे. 5 / 8 शाहरुख आणि सलमानला टक्कर देणारा अभिनेत्याने अनेक रोमॅन्टिक चित्रपटांमध्ये काम केलं.पण एका चुकीमुळे त्याचे करिअर उद्ध्वस्त झाले. 6 / 8 पृथ्वीने आपल्या करिअरमध्ये जवळपास २९ चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, त्याने साकारलेल्या रोमॅन्टिक भूमिका चांगल्या गाजल्या.7 / 8 एका मुलाखतीत पृथ्वीने सांगितले की, करारामुळे त्याचे फिल्मी करिअर उद्ध्वस्त झाले. केवळ एका करारामुळे त्याच्या हातून मोठमोठे चित्रपट निघून गेले आणि तो काहीह करू शकला नाही.8 / 8 त्यानंतर अभिनेत्याने इंडस्ट्रीतून ब्रेक घेत बंगळुरुला शिफ्ट झाला. शेवटचा तो २००५ मध्ये आलेल्या पेट्रोल सिनेमात दिसला.