अभिनेता शवपेटीत अडकून गुदमरला अन्...; बॉलिवूड सिनेमाच्या सेटवर घडलेली भयानक घटना
By देवेंद्र जाधव | Updated: March 23, 2025 15:38 IST
1 / 7हा फोटो पाहून काहींना अंदाज आला असेल की हा किस्सा कोणत्या सिनेमाच्या सेटवर घडलेला. या सिनेमाच्या सेटवर अभिनेता शवपेटीत अडकल्याने सर्वांची घबराट उडाली2 / 7'पुराना मंदिर' सिनेमाच्या सेटवर हा भयानक किस्सा घडलेला. हा सिनेमा शूटिंग करताना कलाकारांना सेटवर अनेक विचित्र घटनांना सामोरं जावं लागलं. त्यापैकीच ही एक घटना3 / 7'पुराना मंदिर' सिनेमात शैतानाच्या भूमिकेत झळकणारे अभिनेते अनिरुद्ध अग्रवाल शूटिंगदरम्यान शवपेटीत अडकले. काय घडलेलं नेमकं?4 / 7दिग्दर्शकाने अॅक्शन म्हटल्यावर अनिरुद्ध यांना शवपेटीतून बाहेर यायचं होतं. परंतु सीन सुरु झाला आणि अनिरुद्ध यांना बाहेर येता येईना. ते शवपेटीत लॉक झाले.5 / 7पुढे अनेक तासानंतर अनिरुद्ध यांना बाहेर काढण्यात आलं. ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांची प्रचंड घुसमट झाली होती. त्यांची अवस्था इतरांना पाहवत नव्हती. सर्वांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. 6 / 7या भयानक घटनेनंतर अनिरुद्ध यांनी काही वेळ ब्रेक घेऊन 'पुराना मंदिर' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. बॉलिवूडमधील प्रमुख हॉरर सिनेमांंमध्ये या सिनेमाचा समावेश जातो. 7 / 7'पुराना मंदिर' सिनेमात मोहनिश बहल, सदाशिव अमरापुरकर, अनिरुद्ध अग्रवाल, पुनीत इस्सर, आरती गुप्ता हे कलाकार होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.