एका पर्वाचा अंत! धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा; कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:26 IST
1 / 9 धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. पण प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. तेव्हापासून धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अशातच आता अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीनं कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. 2 / 9त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 3 / 9 धर्मेंद्र यांच्या निधनाने अभिनेता अजय देवगण हळहळला आहे. त्याने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत म्हटलंय,'धरमजींबद्दल ऐकताच मन सुन्न झालं. त्यांच्यातील उदारपणा, एनर्जी अनेकांना प्रेरणा देणारी ठरली. इंडस्ट्रीने एक दिग्गज अभिनेत्याला गमावलं आहे. ज्यांनी भारतीय सिनेमाला आकार दिला. '4 / 9 अभिनेत्री रवीना टंडनने धर्मेंद्र यांच्या निधनानंतर धक्का बसल्याची भावना व्यक्त केल्या आहेत. तिने सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्याबरोबरचा फोटो शेअर करीत 'सिल्व्हर स्क्रिनवरील हॅण्डसम मॅन, विथ गोल्डन हॉर्ट....', अशी स्टोरी शेअर केली आहे. 5 / 9 'तुम्ही कायम आठवणीत राहाल...ओम शांती...' अशी पोस्ट शेअर करत अभिनेते संजय कपूर यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 6 / 9धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहरने भावुक होत पोस्ट शेअर केलीय. त्यामध्ये त्याने लिहिलंय, 'एका युगाचा अंत झाला.... एक मेगा स्टार... मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीतील एका हिरोचे मूर्त स्वरूप... अतिशय देखणा आणि पडद्यावर अद्भूत स्क्रीन प्रेझेन्स असणारा...भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातला त्याचं स्थान कायम वरती राहील. माणूस म्हणून ते खूप चांगले होते. इंडस्ट्रीतील सर्वांचंच त्यांच्यावर खूप प्रेम होतं. त्यांनीही सर्वांवर खूप प्रेम केलं आणि सकारात्मकता पसरवली. त्यांचे आशीर्वाद, त्यांची मिठी आणि त्यांची आपुलकी शब्दांत व्यक्त न करणारी आहे. आज इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशी जागा जी कोणीही कधीही भरून काढू शकत नाही. धर्मेंद्र यांच्यासारखे केवळ तेच एकमेव होते. धर्मेंद्र सर आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आम्हाला तुमची खूप आठवण येईल. आज स्वर्गही धन्य झाला असेल. तुमच्यासोबत काम करणं हा कायमच माझ्यासाठी एक आशीर्वाद असले. आज माझं मन प्रेमाने, आदराने हेच म्हणतंय की, अभी ना जाओ छोडके.... के दिल अभी भरा नहीं…'7 / 9 अभिनेत्री करीना कपूरने आजोबा राज कपूर आणि धर्मेंद्र एकमेकांना मिठी मारलेली सुंदर फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. 8 / 9 अभिनेत्री अनन्या पांडेने आपल्या इन्स्टाग्रामव स्टोरीवर धरमपाजी यांचे जुने फोटो शेअर करत आठवणी ताज्या केल्या आहेत.' The Greatest...Om Shanti...'असं भावुक कॅप्शन तिने या स्टोरीला दिलं आहे.9 / 9 बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहत लिहिलंय, 'पडद्यावर तुमची उपस्थिती तसंच तुमच्या आठवणी कायम आमच्या स्मरणात राहतील. तुमचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या आत्म्याला शांती मिळो धर्मजी…'