By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 18:53 IST
1 / 9 अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी.बॉलिवूडमधील पहिली लेडी सुपरस्टार म्हणून त्यांना ओळखलं जायचं. 2 / 9जवळपास ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीस सुरूवात केली. तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या.3 / 94 / 95 / 9 1979 मध्ये तिचा 'सोलवा सावन' हा हिंदी चित्रपट आला. मात्र ओळख मिळाली ती 1983 मधील हिंमतवाला या चित्रपटाने. या चित्रपटात तिच्यासोबत जितेंद्र होता. 1983 सालातील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट होता. त्यानंतर तिने जितेंद्रसोबत बरेच चित्रपट केले. त्यानंतर आलेल्या तोहफा या चित्रपटाने त्यावेळच्या चित्रपटाच्या कमाईचे सारे उच्चांक मोडले होते.6 / 97 / 9 1986 मध्ये आलेल्या नागिन या चित्रपटात तिने इच्छाधारी नागिनची भूमिका केली होती. हा चित्रपट सुपर डूपर हिट ठरला. आजही सापांवरील चित्रपटात प्रथम क्रमांक नागिन या चित्रपटाचा लागतो. या चित्रपटातील मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा हे गाणे लोकप्रिय आहे. याचवर्षी तिचे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. सुभाष घई यांचा मल्टीस्टारर कर्मा आणि फिरोज शहा यांचा जांबाज. दोन्ही चित्रपटांतील आपल्या भूमिकांनी श्रीदेवीने चित्रपटरसिकांवर गारुड केलं. 8 / 9 बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळात, सुपरस्टार हे सामान्यतः पुरुष अभिनेते होते. पण या अभिनेत्रीने स्टारडममध्ये पुरुष कलाकारांना टक्कर दिली होती. 1996 मध्ये निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर 'जुदाई' चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी 'मिसेस मालिनी अय्यर' या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. 9 / 9त्यानंतर २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना २०१३ साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.